रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंतीसाठी पोलिसांचा रूट मार्च
अमरावती : रामनवमी, हनुमान जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सण-उत्सवांचे पार्श्वभूमीवर, अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा संदेश देण्यासाठी आज रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, शनिवार ५ एप्रिल रोजी राजापेठ, कोतवाली, खोलापुरीगेट पोलीस ठाण्यांच्या संयुक्त विद्यमाने रूट मार्च पार पडला. एसीपी भवर (राजापेठ) पोलीस निरीक्षक पुनीत कुलट 11 पोलीस अधिकारी, 55 पोलीस अंमलदार 23 SRPF जवान, 6 QRT जवान 16RCB जवान 20 होमगार्ड जवान या रूट मार्चमध्ये सहभागी होते: बालाजी प्लॉट येथून सुरू झालेला हा रूट मार्च गजरे चौक, राजापेठ चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, जव्हारगेट, गांधी चौक मार्गे गांधी चौक येथे समारोप झाला. मार्च दरम्यान नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत सण शांततेत आणि सलोख्याने साजरे करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.