LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नाही – तात्काळ मदत पोहोचवणार – बावनकुळे

राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नाही – तात्काळ मदत पोहोचवणार!”
महसूल मंत्री म्हणाले,

“राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतात, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही तात्काळ निर्णय घेणार आहोत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

कोकाटेंच्या वादग्रस्त विधानावर माफीची भूमिका: शेतकऱ्यांबाबत केलेल्या कोकाटेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, बावनकुळे म्हणाले – शेतकऱ्यांच्या भावना दुखावणं अयोग्य आहे. त्या विधानाबद्दल मी शेतकऱ्यांची माफी मागतो.

राजकारणात पलटवार – राऊत, वडेट्टीवार यांच्यावर टीका, महसूल मंत्री बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या विधेयक टीकेवर पलटवार करत म्हटलं – “जनता कधीच उभाटासोबत जाणार नाही!” त्याचप्रमाणे वडेट्टीवारांच्या वक्तव्याला ‘बालिश’ अशी टीका करत, भाजपचा आत्मविश्वास दाखवून दिला.

महायुतीची आढावा बैठक – विकासकामांचा धागा पकडला
नागपूर दंगली आणि विकासकामांच्या आढावा बैठकीत महायुतीतील नेत्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी नविन दिशा ठरवल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!