पुसदमधील श्री रामायण मंडळ गेली तब्बल ५५ वर्षं अखंड रामायण पाठाचं पावन आयोजन

पुसदम: “रामनवमी म्हटलं की भक्तिभाव, श्रद्धा, आणि परंपरेचं मंगलमय रूप डोळ्यासमोर उभं राहतं.
पुसदमधील श्री रामायण मंडळ गेली तब्बल ५५ वर्षं अखंड रामायण पाठाचं पावन आयोजन करत आहे.
एक अखंड परंपरा, एक निस्सीम श्रद्धा… चला पाहुया हा भक्तीभावाने भरलेला खास रिपोर्ट.”
“५५ वर्षांची अखंड परंपरा, आणि भक्तिभावाचा अखंड झरा…
पुसदच्या श्री रामायण मंडळाने आपल्या संस्कृतीचं आणि श्रद्धेचं जतन करत एक आदर्श घालून दिला आहे.
जय श्रीराम!”
“यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर… आणि इथे दरवर्षी रामनवमीच्या निमित्ताने होणारा एक विशेष आध्यात्मिक उपक्रम – अखंड रामायण पाठ!
पुसद येथील श्री रामायण मंडळ गेल्या ५५ वर्षांपासून चैत्र शुद्ध अष्टमी पासून अखंड रामायण पठणाचं आयोजन करत आहे.
या पठणात गोस्वामी तुलसीदास रचित रामचरितमानसाचा अखंड स्वरुपात वाचन केला जातो.
या पठणास तब्बल १८ तास लागतात आणि या काळात रामभक्त भगवंताच्या लीलांचा रसास्वाद घेत असतात.
गेल्या १० वर्षांपासून नारायण चौधरी यांच्या निवासस्थानी हे पठण अविरतपणे पार पडत आहे.
या भक्तिमय कार्यक्रमात ज्येष्ठ, युवक तसेच बालरामभक्त सुद्धा उत्साहाने सहभागी होत असतात.
रामायण मंडळाच्या सदस्यांसाठी हा पाठ म्हणजे एक ऊर्जा, एक नवी उभारी आहे.
‘रामनामात विलीन होणं हीच खरी साधना’ असं भक्तगणांनी या वेळी सांगितलं.
या पावन परंपरेला केवळ पुसद नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातून देखील श्रद्धाळू येऊन साक्षीदार होतात.”
पुसदमध्ये गेली ५५ वर्षं अखंड रामायण पाठ
रामनवमी निमित्त पावन उपक्रमाचं आयोजन
श्री रामायण मंडळाची अखंड भक्तीपरंपरा
अष्टमीपासून सुरू होतो अखंड रामायण पाठ
१८ तासांचं अखंड रामचरितमानस वाचन
चौधरी कुटुंबाच्या घरी परंपरेला वाहिलेली सेवा
जेष्ठ, युवक, बालगोपाळांचा भक्तीमय सहभाग
पुसदच्या रामभक्तांचा जाज्वल्य उपक्रम
‘रामनामातली ऊर्जा अमर आहे’ – रामभक्तांचं मत
यवतमाळ जिल्ह्याच्या श्रद्धेचा आदर्श ठरले पुसद
“५५ वर्षांची परंपरा! पुसदमधील अखंड रामायण पाठाने रामभक्त भावविभोर
पुसदमधील श्री रामायण मंडळाने रामनवमीच्या पूर्वसंध्येला अखंड रामायण पाठाची ५५ वर्षांची परंपरा याही वर्षी जपली आहे.
१८ तास चालणाऱ्या या भक्तिपाठात सर्व वयोगटातील रामभक्त सहभागी होतात