AmravatiLatest News
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती : विक्रमा सिम्हापूरी विद्यापीठ, नेल्लोर येथे दि. 30 एप्रिल ते 3 मे, 2025 दरम्यान होणाया अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूमध्ये श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. वैष्णवी गिरी, कु. तेजस्विनी गुल्हाने, कु. राधिका दानखडे व कु. लोकेशा तायवाडे, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगांव सुर्जीची कु. साक्षी वानखडे, कु. शिवानी वानखडे, कु. नितु नेमाडे व कु. अर्पिता गायगोले, भारतीय महाविद्यालय, अमरावतीची कु. दिपाली ढोले व कु. वैष्णवी हिरुळकर, सिपना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची कु. तन्वी देशमुख, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. आकांशा वाघमारे, सरस्वती महाविद्यालय, दहिहांडाची कु. रिया डांगरे, जनता कला, वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरची कु. भक्ती सोळंके, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. सोनाली तसरे, ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यवतमाळची कु. मृणल फुसाटे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, भातकुलीची कु. अंकिता हिवरकर, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरणनगर, अमरावतीची कु. साक्षी चाफळकर, श्रीमती शकुंतलाबाई राऊत महाविद्यालय, वनोजाची कु. नेहा बुंदेले, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची कु. प्राची कुचार, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसदची कु. प्रियंका मोरे यांचा समावेश आहे.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूचा प्रशिक्षण वर्ग श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे दि. 18 ते 27 एप्रिल, 2025 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.