अमरावतीत श्रीराम नवमी निमित्त भव्य धार्मिक उत्सव – राणा दाम्पत्यांच्या उपस्थितीत अभिषेक आणि महाआरती

अमरावती: हनुमानगढी, अमरावती येथे हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रामभक्तांसाठी हनुमानगढी हे नेहमीच श्रद्धेचं केंद्र राहिलं आहे, आणि यंदाचा उत्सव आणखीनच विशेष ठरत आहे.
6 एप्रिल रोजी श्रीराम नवमीच्या निमित्ताने हनुमानगढी येथे सकाळी 8 वाजता प्रभू श्रीराम यांचा अभिषेक सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा जन्म सोहळा आणि कलश स्थापना कार्यक्रम झाला. या पवित्र क्षणी खास उपस्थिती होती आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांची. त्यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांचा अभिषेक आणि भव्य महाआरती पार पडली. कार्यक्रमाला सुनील राणा, आमदार प्रवीण तायडे, नितीन बोरेकर, पराग चिमटे यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या धार्मिक पर्वाचा पुढील भाग 7 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे, ज्यामध्ये – दररोज रामचरितमानस पठण, हनुमान चालीसा 11 वेळा पठण सकाळी 5 आणि सायंकाळी 7 वाजता, 9 व 10 एप्रिलला अखंड रामायण पठण याची समाप्ती होणार आहे. होम-हवन ने 12 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता श्री हनुमानजी यांचा अभिषेक 9 वाजता सुंदरकांड पठण 12 वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा आणि महाप्रसाद हे संपूर्ण आयोजन हनुमान चालीसा चॅरिटेबल ट्रस्ट, हनुमानगढी यांच्या वतीने करण्यात आले असून, आयोजकांनी सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.