आधीची चूक दुरुस्त करणारच, खुलताबादच्या नामांतरावरून संजय शिरसाट हटेनात, खुलताबादचं रत्नापूर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीभोवती महाराष्ट्राचे राजकारण स्थिरावलेले असताना छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादचं नाव रत्नापूर करावं अशी मागणी वारंवार होत आहे. इंग्रजांच्या काळापासून हे नाव रेकॉर्डवर आहे. त्यामुळे नामांतर करण्याबाबत मुख्यमंत्री यांना मी या सगळ्या संदर्भात पत्र देत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळात दोन्ही सभागृहात याला मंजुरी घ्यावी लागेल. मग केंद्राच्या मान्यतेनुसार हे नाव बदलले जाईल असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहेत. दरम्यान, शिवसेनेकडून वक्फ विधेयकाला होणाऱ्या विरोधावरही त्यांनी उबाठा किती बोंबलले तरी काही होणार नाही .उबाठा एकटी पडली आहे इंडिया आघाडी संपली आहे .शेवटच्या घटका उबाठा मोजत आहे. असा टोलाही शिरसाटांनी लगावला.
काय म्हणाले शिरसाट?
खुलताबादचं नाव याआधी सुद्धा रत्नपुर होतं हे रेकॉर्ड वर आहे.इंग्रजांच्या काळापासून नाव रेकॉर्ड वर रत्नपुर चा आहे.दौलताबादचा नाव दौलताबाद नाही देवगिरी आहे.देवगिरी प्रांत त्याला म्हटलं जायचं.हे नामांतर नाही झालेली चूक दुरुस्त करायची आहे.औरंगजेबाची कबर खोदायचा विषय जेव्हा काढला तेव्हा काही जणांचा त्याचा त्रास झाला. त्यांना त्याचा स्वाभिमान आहे आम्हाला आमचा स्वाभिमान जागृत करायला नको का? असा सवालही शिरसाटांनी केला. नवीन आम्ही काही मागत नाही आहे.मुख्यमंत्री यांना मी या सगळ्या संदर्भात पत्र देत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या विधिमंडळात दोन्ही सभागृहात याला मंजुरी घ्यावी लागेल.मग केंद्राच्या मान्यतेनुसार हे नाव बदलले जाईल. असे शिरसाट म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वक्फच्या विधेयकावर विरोधकांकडून मोठी टीका होत असताना देवदर्शनाच्या सगळ्या जमिंनी आपल्या मित्रांना, उद्योगपतींना देणार असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून होत आहे.यावर कुठलेही जागेवर सरकारचा डोळा नाही .या जमिनी आदानी अंबानीला देतील असं कधी होईल का? हजार एकर असलेली ही जागा आहे.
सहजासहजी कोणाच्या घशात या जागा टाकता येत नाहीत.कॅथलिक चर्च जागा आम्हाला कशाला हव्यात? या जागा सगळे अधिकृतपणे दिसतील.मुस्लिम ख्रिश्चन समाजाची मत आपल्याकडे कशी येतील हा प्रयत्न या माध्यमातून होतोय .या समाजाला माहिती आहे सरकारने घेतली भूमिका योग्य आहे .उबाठा किती बोंबलले तरी काही होणार नाही .उबाठा एकटी पडली आहे इंडिया आघाडी संपली आहे .शेवटच्या घटका उबाठा मोजत आहे. असा टोलाही शिरसाटांनी लगावला.