LIVE STREAM

Latest NewsVidarbh Samachar

गो. से. महाविद्यालयामध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

खामगाव :- स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळद्वारे संचलित गो. से.  विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ ला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा पदी प्रमाणपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन उमेश शुक्ला हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे हे होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, उप प्राचार्य डॉ. पी. व्ही. उबाळे, विद्यार्थी विकास समितीचे समन्वयक डॉ. जे. डी. पोरे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. डी. एन. व्यास, कला शाखा प्रमुख डॉ. आर. आर. गव्हाळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ गीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर सर यांनी सांगितले की, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अभिनंदन व कौतुक करण्याकरता आपण येथे जमलो आहोत पदवी प्राप्त करणे हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो याकरिता आमच्या महाविद्यालयातील प्रत्येक घटक आपापल्या परीने झटत असतो. याप्रसंगी दीक्षांत भाषणातून मार्गदर्शन करताना कॅप्टन उमेश शुक्लाजी यांनी सांगितले की, आपल्या आयुष्याची खरी सुरुवात ही आजच्या या सोहळ्यापासून झाली असून येणाऱ्या आयुष्यामध्ये अधिक परिश्रम करून आपण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी या शिदोरीच्या आधारावर प्रयत्न करावा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणे हे होते अपेक्षा प्रमोद सांगोले अर्थशास्त्र प्रथम मेरिट मनीषा गजानन विचनकर अर्थशास्त्रातील द्वितीय मेरिट, विजया सुभाष कोलपे अर्थशास्त्रातील चौथे मेरिट, निशा पुरुषोत्तम खंडेलवाल विषयातील चौथे मेरिट, अनुजा शिवदास पालीवार रसायन शास्त्रातील तिसरे मिनिट, नेहा विजय सुरडकर वनस्पती शास्त्रातील चौथे मिरीट यांना सन्मानचित्र आणि पदवी देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमाणपत्र सोहळ्याकरिता विविध विषयातील सुमारे १५० विद्यार्थी उपस्थित होते आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. सुभाषजी बोबडे यांनी सांगितले की, केवळ पदवी मिळवण्या पुरते आपले शिक्षण मर्यादित न राहता त्याचा समाजासाठी योग्य उपयोग झाला पाहिजे. कार्यक्रमाकरिता विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी संचालक विविध शाखेतील विभाग प्रमुख प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता दीक्षांत समारंभ समितीचे समन्वयक डॉ. जे. डी. पोरे, सदस्य डॉ. डी. एम. नागरिक, डॉ. नीता बोचे, प्रा. एस. एम. पिढेकर, प्रा. डॉ. बी. एम. टकले यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहिणी धरमकार यांनी तर आभार प्रदर्शन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. व्ही. पडघन यांनी केले. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!