मुर्तीजापूर रेल्वे स्थानकाजवळ आग; सुदैवाने जीवितहानी टळली
मुर्तीजापूर: नॅरोगेज रेल्वे स्थानकाजवळ अचानक भडका – मुर्तीजापुरमध्ये आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून, एकच खळबळ उडाली! लोको शेड परिसरात लागलेल्या या आगीत कचरा व झाडाझुडप जळून खाक झालं. सिटी न्यूज ने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रचंड उन्हामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुर्तीजापुर नॅरोगेज रेल्वे स्थानकाच्या लोको शेडजवळ आज दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भीषण उन्हामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लोको शेड परिसरातील सुकलेली झाडाझुडपं आणि कचऱ्याला आग लागून ती काही क्षणातच मोठ्या क्षेत्रात पसरली. धुराच्या लोटांमुळे परिसरात दाट काळोख पसरला होता. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अग्निशमन दल आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) चे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, हे सुदैव मानलं जात आहे. तथापि, आग लागण्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांची शक्यता वाढत असून, रेल्वे आणि नागरी प्रशासनाला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.