IT कंपनीला 4.83 कोटींचा गंडा! Hexaware Technologies मधील 7 कर्मचाऱ्यांचा डिजिटल विश्वासघात

नागपूर: नागपूरच्या मिहान परिसरातील प्रसिद्ध आयटी कंपनी Hexaware Technologies ला स्वतःच्याच कर्मचाऱ्यांनी तब्बल 4 कोटी 83 लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, डिजिटल युगातील हा फसवणुकीचा प्रकार IT कंपन्यांसाठी इशारा ठरत आहे.
फसवणुकीचा प्रकार काय?
Hexaware Technologies कंपनीकडून ई-कॉमर्स क्लायंट्ससाठी ग्राहकांच्या रिफंड प्रक्रियेची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती. मात्र, या कर्मचाऱ्यांनी सामान परत घेतल्याशिवाय ग्राहकांना रिफंड जारी केला. यामुळे क्लायंट कंपन्यांचं मोठं नुकसान झालं, तर संबंधित कर्मचाऱ्यांनी रिफंडची रक्कम गुपचूप हडप केली.
क्वालिटी टीमनं उघड केला घोटाळा
कंपनीच्या क्वालिटी आणि ऑडिट टीमनं तपासणीदरम्यान संशयास्पद व्यवहारांचा छडा लावला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पोलीसात FIR दाखल करण्यात आली आहे.
फसवणूक करणारे कर्मचारी कोण?
या फसवणुकीत सहभागी असलेल्या सात कर्मचाऱ्यांची नावं पुढीलप्रमाणे – जयंत समीर दास, आदित्य वसंत डोंगरे, पियूष योगेश सोडारी, मुकेश कुमार, पवन प्रल्हाद चचाने, अजिंक्य प्रदीपराव मेश्राम, सुरेंद्र कुमार हरीराम आगासे
या सातही आरोपींविरोधात फसवणूक, विश्वासघात, आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
सध्या पोलीस अधिक तपास करत असून, या घोटाळ्यामागे आणखी कोणी आहे का? याचा शोध घेतला जात आहे. आयटी कंपनीतील हा घोटाळा म्हणजे डिजिटल युगातील विश्वासघाताचं ताजं उदाहरण आहे.