Pune Crime News: पुण्यात तरुणीचा प्रताप! आधी कोल्ड कॉफी पाजली, मैत्रिणीशी बोलली अन् तिच्याच घरातील दागिने लुटले

पुणे: पुण्यामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जिवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पुण्यामध्ये एका तरुणीने आपल्या जिवाभावाच्या मैत्रिणीला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीला कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्याच घरातील 6 लाखांचे दागिने लुटून तरुणी फरार झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 25 वर्षीय तरुणीला अटक केली. पुण्यातल्या आंबेगावमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड (25 वर्षे) या तरुणीला अटक केली. पुण्यातील आंबेगाव भागातून ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सगळी घटना 6 मार्च रोजी संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या एमराईड सोसायटीमध्ये घडली. फिर्यादी तरुणी ही तिच्या घरी असताना तिची मैत्रीण घरी आली. यावेळी तिनी येताना कोल्ड कॉफी सोबत आणली आणि ती तिने मैत्रिणीला पिण्यासाठी दिली. मैत्रिणीनं आणलेली कोल्ड कॉफी कुठला ही विचार न करता फिर्यादी तरुणीने पिऊन टाकली. दरम्यान, याच कोल्ड कॉफीमध्ये आरोपी तरुणीने गुंगीचे औषध मिसळले होते. गुंगीचे औषध मिळाल्यामुळे फिर्यादी या बेशुद्ध पडल्या. याचाच फायदा मैत्रिणीनं घेतला आणि थेट बेडरूममध्ये जाऊन कपाटाचे ड्रॉव्हर मधील 5 लाख 46 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून तिने तिथून पळ काढला.
फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबतची चौकशी मैत्रिणीकडे केल्यावर आपणच तिच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली आणि दागिने परत करते असे आश्वासन दिले. मात्र, वारंवार विचारून सुद्धा मैत्रिणीने दागिने परत न दिल्यामुळे तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मधील कर्मचारी आरोपी तरुणीचा शोध घेत असताना ही तरुणी पुणे स्टेशन येथे असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व तिच्याकडून फिर्यादी यांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.