अकोला : १४ वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार; आरोपी फरार
अकोला: काल रात्री अकोला रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षांच्या निष्पाप मुलीवर अमानुष अत्याचार झाला. ती मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत उभी असताना, एक नराधम तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवतो आणि तिचं अपहरण करतो. आरोपी तिला अकोटफैल भागातल्या एका निर्जन स्थळी घेऊन जातो… आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करतो. “ही मुलगी खामगाव, जिल्हा बुलढाणा येथून मैत्रिणीला भेटण्यासाठी अकोल्यात आली होती. पण तिला माहितही नसतं की, तिचं आयुष्य एका रात्रीत बदलून जाईल. “हे विचार करणेच भयावह आहे की, त्या मुलीने त्या क्षणी काय अनुभवले असेल?
तिच्या मैत्रिणीने किती हतबलतेने ही घटना पाहिली असेल? अत्याचारानंतर आरोपीने तिला पुन्हा रेल्वे स्टेशनवर सोडले, जणू काही त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही!” “घडलेल्या घटनेने मुलीच्या नातेवाईकांमध्ये आणि अकोल्यातील जनतेत संताप उसळला आहे. पीडित मुलीने रामदास पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरु आहे.”
मात्र केवळ गुन्हा नोंदवणे पुरेसे नाही. समाजात अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी आता तीव्र झाली आहे. कारण दररोज अशा घटना वाढत आहेत, आणि प्रशासनाच्या प्रतिक्रियेत गंभीरतेचा अभाव दिसतो.“ही घटना केवळ एका मुलीवर झालेला अत्याचार नाही, तर संपूर्ण कायदा व्यवस्थेवरचं एक प्रश्नचिन्ह आहे. आपल्या घरातील, शाळेतील, रस्त्यावरील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाला सतावत आहे. आता वेळ केवळ राग व्यक्त करण्याची नाही, तर ठोस उपाययोजनांची मागणी करण्याची आहे, आरोपीला कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय समाजात बदल घडणार नाही.