AmravatiLatest News
डॉ. जयराज फाटक, भा. प्र. से. (से. नि.) महासंचालक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिली अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट

अमरावती : डॉ. जयराज फाटक, भा. प्र. से. (से. नि.) महासंचालक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आज दिनांक ८ एप्रिल,२०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे भा.प्र.से. यांनी डॉ. जयराज फाटक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. जयराज फाटक यांचे सोबत संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक, अमरावती उप केंद्राचे सोहम कुलकर्णी उपस्थित होते. नगरविकास आणि शिक्षण व प्रशिक्षण या विषयात संस्थेच्या योगदानाबद्दल यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाशी चर्चा झाली. डॉ. जयराज फाटक यांनी मुंबई महानगरपालिकेत आयुक्त असतांनाचे अनुभव पण सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, सहायक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दिपीका गायकवाड, धनंजय शिंदे उपस्थित होते.