LIVE STREAM

Latest NewsNanded

नांदेड : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन | मगनपुरा नागरिकांचा संताप

नांदेड मगनपुरा – नांदेड शहरावर पाणीटंचाईचं संकट अधिकच गडद होत चाललं असून, मगनपुरा परिसरातील नागरिकांचा संयम अखेर सुटला. गेल्या 15-20 दिवसांपासून नळाला पाणी न आलेल्या भागातील नागरिकांनी आज थेट ‘शोले’ चित्रपटाच्या स्टाईलने पाण्याच्या टाकीवर चढून आक्रमक आंदोलन केलं.

“पाणी द्या… पाणी हवंय!” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेष बाब म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. उन्हाच्या तडाख्यातही त्यांनी आपला संताप व्यक्त करत आंदोलनात भाग घेतला.

मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. पाण्याचा पुरवठा तांत्रिक कारणांमुळे वारंवार खंडित होत असून, मनपाचे दुर्लक्ष सुरूच आहे.

आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

प्रशासनाची उदासीनता – मोठा मुद्दा
या घटनेमुळे नांदेड महापालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे इतकं दुर्लक्ष का केलं जातं, हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा बनला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!