LIVE STREAM

Latest NewsNanded

नांदेड : मालटेकडीतील फर्निचर गोडाऊनला भीषण आग | लाखोचं नुकसान

नांदेड : मालटेकडी परिसरातील एका फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सविस्तर वृत्त पाहूया आमचे प्रतिनिधी मनोज मनपुर्वे यांच्या या रिपोर्टमध्ये. नांदेड शहरातील मालटेकडी भागात असलेल्या काका कुशन फर्निचरच्या गोडाऊनला अचानक आग लागली. आगीचं स्वरूप एवढं भीषण होतं की काही मिनिटांतच संपूर्ण गोडाऊन धुराच्या ढगात गढलं. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. ही आग शेजारील इतर दुकानांपर्यंत पोहोचू न देता विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या घटनेत लाखो रुपयांचे फर्निचर, कापड आणि इतर सामग्री जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्टसर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे, परंतु अधिकृत तपास सुरू आहे. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना दूर हटवून नियंत्रण मिळवलं. स्थानिकांनीही अग्निशमन दलाला मदत केली. घटनास्थळी अद्याप धुराचे लोट पाहायला मिळत आहेत, परंतु परिस्थिती नियंत्रणात आहे.

नांदेडमधील या आगीच्या घटनेमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास प्रशासन करत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!