LIVE STREAM

Amaravti GraminCrime NewsLatest News

परतवाडा ब्राह्मण सभा कॉलनीत सोनसाखळी चोरी! दोन अज्ञात चोरटे पसार

परतवाडा – सुरक्षित परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राह्मण सभा कॉलनीत काल सायंकाळी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या चोरांची शोधमोहीम सुरू
सायंकाळी साडेसातच्या सुमारास, किरण कैलास शर्मा या महिला आपल्या मैत्रीण अर्चना शाळासोबत वाघामाता मंदिर दर्शन करून परतत असताना, दोन अज्ञात मोटरसायकल सवारांनी त्यांच्या दिशेने वेगाने येत १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि क्षणात पळ काढला.

ठाणेदाराच्या घराजवळच घटना; पोलीस सतर्क
विशेष म्हणजे, ही घटना परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश मस्के यांच्या राहत्या घराजवळच घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परतवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले असून, सीसीटीव्ही फूटेजची तपासणी आणि स्थानिकांची चौकशी करून चोरट्यांचा माग काढला जात आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता
घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अशा चोरट्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या भागात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक पोलीस बंदोबस्त, पेट्रोलिंग वाढवणं आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!