LIVE STREAM

AmravatiLatest News

विद्यापीठाच्या उन्हाळी 2025 लेखी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, बी.आर्च. सेमिस्टर-चार (सी.बी.सी.एस.), बी.पी.ई.एस. सेमिस्टर-सहा (सी.बी.सी.एस.), एम.पी.ए. (ड्रामा अॅन्ड थिएटर) सेमिस्टर-एक, बी.टेक. सेमिस्टर-एक व दोन या अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात दुरुस्ती करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

           यासंदर्भात सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये व परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुद्धा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!