सैफ अली खानच्या मारहाणीप्रकरणी मलायकाला कोर्टाचं समन्स – १२ वर्षांनंतरही प्रकरण अद्याप प्रलंबित!

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान एकदा नव्हे तर अनेकदा वादात अडकला आहे. २०१२ मध्ये घडलेलं एक प्रकरण चांगलंच गाजलं होतं. हे प्रकरण आजही कोर्टात आहे. एका एनआरआय बिझनेसमनला मारहाण केल्याचा आरोप सैफ अली खानवर करण्यात आला होता. एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेलेल्या सैफनं तिथं एका व्यक्तीला मारहाण केली होती, असं म्हटलं गेलं होतं. यावेळी त्याच्यासोबत करिना कपूर, करिश्मा कपूर, मलायाका अरोरा अमृता अरोरा या देखील होत्या. याच प्रकरणात आता मलायका विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
प्रकरण नेमकं आहे तरी काय?
तर १०१२मध्ये सैफ अली खानचं हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. इक्बाल मीर शर्मा असं सैफ अली खानवर आरोप करणाऱ्या व्यक्तीच नाव आहे. या व्यक्तीनं सैफवर मारहाण व शिवीगाळ केल्याचे आरोप केले होते. सैफ अली खाननं माझ्या नाकावर मारलं, त्यामुळं माझं नाक फ्रॅक्चर झालं. तसंच सैफसोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी माझ्या सासऱ्यालाही मारहाण केली…असं इक्बाल मीर शर्मा यांनी आरोप करताना म्हटलं होतं.
कथाकथीत मारहाणीच्या प्रकरणात मलायका, अमृता या साक्षीदार होत्या. त्यांना वेळोवेळी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण त्या कोर्टात हजर झाल्या नाहीत. याच प्रकरणात १५ फेब्रुवारी रोजी देखील मलायकाच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं होतं. पण ती तेव्हाही हजर झाली नाही. आता आजच्या तारखेचं वॉरंट निघाल्याची माहिती आहे.
अमृतानं कोर्टात काय सांगितलं?
दरम्यान, मलायकाची बहीण अमृतानं कोर्टात हजर राहत तिचा जबाब यापूर्वीच नोंदवला आहे. आम्ही पार्टी करण्यासाठी तिथं गेलो होते. हॉटेल स्टाफकडून आम्हाला जी जागा दिली होती. तिथंच आम्ही बसलो होतो. तेवढ्यात एक व्यक्ती आमच्या टेबलजवळ आला आणि मोठमोठ्यानं ओरडू लागला,असं असूनही सैफनं त्याची माफी मागितली. नंतर सैफ वॉशरुममध्ये गेला. तिथं पुन्हा या दोघांचं भांडण झाल्याचं अमृतानं म्हटलं होतं.