अमरावती बेलोरा विमानतळ येथून 16 एप्रिल ला मुंबई कडे उड्डाणं घेणार प्रवासी विमान
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बेलोरा विमानतळावरून १६ एप्रिलपासून थेट मुंबईसाठी प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहे. या ऐतिहासिक उड्डाणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिक शुभारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पहिलं उड्डाण: १६ एप्रिल रोजी सकाळी ११:४०
अलायन्स एअर कंपनीचं ATR-72 आसनी विमान सकाळी ११:४० वाजता अमरावतीहून मुंबईकडे उड्डाण घेणार असून, दुपारी १:१५ वाजता मुंबई विमानतळावर लँडिंग होईल. या उड्डाणासाठीचं पहिलं बुकिंग पूर्णतः फुल्ल झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
विमानतळ पूर्णतः कार्यान्वित – यशस्वी चाचण्या पूर्ण
गेल्या महिन्यात बेलोरा विमानतळावर ‘पीएपीआय (Precision Approach Path Indicator)’ ची यशस्वी चाचणी पूर्ण झाली होती. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फ्लाइट इन्स्पेक्शन युनिटने संयुक्तपणे धावपट्टीची कॅलिब्रेशन चाचणी घेतली होती.
अत्याधुनिक धावपट्टी आणि सुविधा
अमरावती विमानतळावर नव्याने तयार केलेली १८ x ५० मीटर आकाराची धावपट्टी ही एटीआर ७२ सारख्या विमांसाठी योग्य आहे. प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत सुरू होणारी ही सेवा विदर्भासाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे.