LIVE STREAM

India NewsLatest News

टेक उद्योजक प्रसन्न शंकर वादाच्या भोवऱ्यात – पत्नीवर आरोप, पत्नीकडूनही धक्कादायक खुलासे

Prasanna Shankar: भारतीय वंशाच्या टेक उद्योजकाची वैयक्तिक आयुष्यातील एका वादामुळे चांगलीच चर्चा आहे. 10 अब्ज डॉलर्सच्या कंपनीचा मालक असणाऱ्या HR कंपनी Rippling चा संस्थापक असणारा प्रसन्न शंकर (Prasanna Shankar) या टेक उद्योजकाने याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधावरून सोशल माध्यमावर पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले होते. यानंतर आता त्यांच्या पत्नीनेही प्रसन्न शंकरच्या आरोपांवर भाष्य करत उत्तर देत त्याच्यावर मोठे आरोप केले आहेत. स्वत: प्रसन्नाचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्याने पत्नीला ‘ओपन मॅरेज’ करायला भाग पाडले, असा खळबळजनक दावा पत्नीने न्यायालयात केला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसन्न शंकरची पत्नी दिव्याने दावा केला आहे, तिच्या पतीने प्रसन्नने तिच्यावर जबरदस्ती केली होती. त्याने अनेकदा वेश्यांसोबत संबंध ठेवले होते, तिच्यावर नजर ठेवली होती आणि तिचं रेकॉर्डिंगही केलं होतं. त्याने बाथरूम देखील सोडलं नाही. दिव्याने आरोप केला की, प्रसन्ना तिला आणि तिच्या मुलाला वेगवेगळ्या देशांमध्ये घेऊन जात राहिला जेणेकरून तो त्याचा कर वाचवू शकेल.

प्रसन्नाने प्रसुतीनंतर शरीर संबंध ठेवले अन्
दिव्याने आपला पती प्रसन्न शंकरबाबत आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. तो म्हणजे, प्रसन्नाने प्रसूतीनंतरही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, तेव्हा तिला शारीरिक वेदना होत होत्या, तरीही प्रसन्नाने तिच्यासोबत संबंध ठेवले. ‘प्रसन्ना म्हणायचे की शरीर सुख ही त्यांची मूलभूत गरज आहे. मी कितीही वेदनेत असले तरी मला ते करावेच लागत असे. नाहीतर ते बाहेर दुसरीकडे जातील’, असंही दिव्याने सांगितलं आहे.

प्रकरण काय आहे?
प्रसन्न शंकर या उद्योजकाच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असा आरोप केला होता की, त्यांच्या पत्नीचे गेल्या काही वर्षांपासून एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत. हे त्यांच्या पत्नीला कळताच पत्नीने घरगुती हिंसाचार आणि छळाचा त्यांच्यावर आरोप केला. पत्नीने प्रसन्न शंकर यांच्याविरोधात खोटी पोलीस तक्रार दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याच्या पत्नीने भारताऐवजी अमेरिकेत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. प्रसन्न म्हणाले, त्यांच्या पत्नीने त्यांच्या 9 वर्षांच्या मुलाला लपवून ठेवले. या कारणास्तव त्यांनी पत्नीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर अमेरिकन न्यायालयाने प्रसन्न यांच्या बाजूने निकाल दिला.

प्रसन्न शंकर कोण?
भारतीय वंशाचा तमिळनाडूचा असणारा प्रसन्न शंकर हा सिंगापूरस्थित क्रिप्टो सोशल नेटवर्क या सॉफ्टवेअर कंपनी ‘रिप्लिंग’चा संस्थापक आहे. प्रसन्न शंकर सध्या त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधांवरून केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहे. घटस्फोट आणि मुलाचा ताबा या लढाईत अडकलेला प्रसन्न शंकर एक टेक उद्योजक आहे. चेन्नईच्या या उद्योजकाने अलिकडेच सोशल मीडियावरून त्याच्या घरगुती वादाचा सगळाच उलगडा केला. यात पत्नीच्या प्रेमसंबंधांपासून, घटस्फोट, पोटगी आणि मुलाच्या कस्टडीवरून हा सगळा वाद आहे. प्रसन्न शंकर उर्फ प्रसन्न शंकरनारायणन हे सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय वंशाचे टेक उद्योजक आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्तम प्रोग्रामर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसन्न शंकर यांनी महाविद्यालयीन शिक्षणात टॉप कोडर म्हणून स्थान मिळवलंय. गुगल कोड जॅमसारख्या मंचावर उत्कृष्ट म्हणून गणले गेले आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी असणाऱ्या प्रसन्न शंकर यांनी 2004-2008 दरम्यान संगणक शास्त्रात पदवी मिळवली. तिथेच त्यांची दिव्या शशिधर हिच्याशी भेट झाली. गुगल मायक्रोसॉफ्ट सारख्या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी स्वत:ची कंपनी उघडली. फोर्ब्सच्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे एक अब्ज डॉलर (9,000कोटी रुपये) आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!