ठाणे हादरले! 10 वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, नंतर मृतदेह सहाव्या मजल्यावरुन खाली फेकला

Thane Crime News: ठाण्यातील मुंब्रात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Thane Crime News: ठाण्यातील मुंब्रा येथे एका 10 वर्षांच्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह इमारतीच्या डक्ट भागात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांनी मध्य रात्री पोलिस स्थानकात धाव घेऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीला तीन तासांच्या आत ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डिंगच्या डक्टमध्ये उंचावरुन काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने नागरिकांनी खिडकी उघडून टॉर्च लावून बघितले. तेव्हा अंदाजे दहा वर्षांची मुलगी पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आली. नागरिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा पोलीसांनी घटनास्थळी जावून खात्री करून अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या साह्याने डक्टमधील मुलीस बाहेर काढून तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी सुरुवातीला मुलीच्या मृत्यूबाबत कस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता. मात्र मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने मुंब्रा पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जात तेथील लहान मुलांकडे चौकशी करून तसेच इतर पुरावे गोळा करून सदर बिल्डिंगमधील सर्व घरांच्या डक्टची पहाणी करून इतर साक्षीदार यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सहाव्या मजल्यावरील 19 वर्षीय आसिफ अकबर मन्सुरी याला ताब्यात घेतलं.