महावीर जन्मकल्याणक निमित्य अभिनंदन पेंढारी मित्र परीवारा तर्फे कारागृहात रोगनिदान शिबीर संपन्न
अमरावती : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जैन समाजाच्या वतीने उत्साहाने व भक्तीभावाने साजरा केला जातो. अभिनंदन पेंढारी मित्र मंडळाच्या वतीने अभिनंदन पेंढारी यांनी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत जगा आणि जगु द्या या घोषवाक्याचे महत्व विषद करीत अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे रोगनिदान शिबीर आयोजित केले. या शिबिराच्या कार्यक्रमा करीता अध्यक्षस्थानी कारागृहाच्या अधिक्षिका कीर्तिताई चिंतामणी तर प्रमुख अतिथी डॉ. अजयजी डफळे डायबेटीस तथा हार्ट तज्ञ, डॉ. महेंद्र गुढे संचालक अक्झान हॅlपीटल, डॉ आय टी गेमनानी, डॉ प्रज्ञा चौधरी,डॉ.दीपाली भैसे, राजेश पिदडी डायबेटीस असोसिएशन जनसंपर्क अधिकारी,रुपेश नगरनाईक एम आर, डॉ माधव घोपरे, विलासजी भोईटे उप अधीक्षक, पुरुषोत्तम मुंदडा, अनिल सुराणा, गिरी साहेब, ललित मुंढे, संजय गोलप, मंगेश ज्यांभूलकर, वैशाली मोहोड, हेमंत लवाले, आकाश इंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी ऐक्झाण हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, डायबेटीस असोसिएशन याचे सयुक्त विद्यमाने महत्वपूर्ण योगदान लाभले. कार्यक्रमाचे सुरुवातीस श्री भगवान महाविरांच्या प्रतिमेस नमन करण्यात आले. सर्व अतिथीचे आयोजक अभिनंदन पेंढारी यांनी मोत्याची माळा, जैन धर्माचे दुपट्टे, श्रीफल देऊन स्वागत केले. अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन श्री भगवान महाविरांचे कार्य व समाजाला दिलेला संदेश यावर मार्गदर्शन करीत रोगनिदान शिबिराचे आयोजनाची कल्पना विषद केली. याप्रसंगी डॉ डफळे, डॉ महेंद्र गुढे, डॉ गेमनानी, राजेश पिदडी, अनिल सुराणा, पुरुषोत्तम मुंदडा यांनी आपल्या मनोगतातून उत्तम आरोग्याचे महत्व समजावून देत निरोगी आयुष्यासाठी अश्या शिबिराची गरज आहे व ते काम अभिनंदन पेंढारी करीत आहे ही गौरवाची बाब आहे असे सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षा कीर्तिताई चिंतामणी यांनी आपल्या भाषणातुन एक चांगला उपक्रम या ठिकाणी घेतल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देत कारागृहाच्या परिसरात रोग निदान शिबीरा चे आयोजन होणे ही चांगली बाब आहे. अभिनंदन पेंढारी नेहमीच या ठिकाणी प्रबोधनात्मक तसेच साधु संताचे वैचारीक उपदेशाचे कार्यक्रम करतात. निरामय आरोग्याचे साठी आज हे शिबीर निश्चितच सर्वांसाठी उपयोगी झाले आहे. सौ डॉ दीपाली भैसे यांनी सकस आहार कसा असावा या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी कारागृहातील बंदीजन व कर्मचारी यांनी आपली तपासणी करून घेतली व ज्यांना औषधाची गरज आहे अश्या गरजुना विनामुल्य औषधीचे वितरण करण्यात आले. कार्यकमाचे संचालन अभिनंदन पेंढारी तर आभार विलासजी भोईते अतिरिक्त उपअधीक्षक यानी केले.