विद्यापीठाची पर्यावरणीय अभ्यास विषयाची उन्हाळी -2025 परीक्षा महाविद्यालय स्तरावर 16 जून रोजी होणार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पर्यावरणीय अभ्यास विषयाची उन्हाळी – 2025 परीक्षा 16 जून, 2025 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत महाविद्यालय स्तरावर घेण्यात येणार आहे. परीक्षेस पात्र असलेल्या व परीक्षा आवेदनपत्र भरलेल्या उन्हाळी – 2025 मध्ये प्रवेशित होणा-या सत्र/सी.जी.एस./सी.बी.एस.एस. पध्दतीमधील विद्याथ्र्यांची (विधी व बी.व्होकसह) लेखी परीक्षा उपरोक्त तारीख व वेळेत महाविद्यालय स्तरावर विद्यापीठाव्दारे पुरविण्यात येणा-या प्रश्नपत्रिकांनुसार होईल, असे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
उपरोक्त परीक्षेच्या सर्व संबंधित विद्याथ्र्यांना पर्यावरणीय अभ्यास या आवश्यक विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या वेळापत्रकाची माहिती देण्यात यावी. तसेच सत्र/सीजीएस (सीबीसीएस लागू होण्याच्या पूर्वीचे विद्यार्थी) पध्दतीच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा संचालनानंतरची पुढील कार्यवाही महाविद्यालयांनी करावी.
सी.बी.सी.एस. अभ्यासक्रमांच्या पर्यावरणशास्त्र विषयाची परीक्षा ह्रा संबंधित अभ्यासक्रमांच्या निदेशानुसार संचालित करण्यात येत आहेत. सदर परीक्षा ह्रा विद्याथ्र्यांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यापीठामार्फत पुरविण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांनुसार घेण्यात येईल. सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे. सी.बी.सी.एस. पध्दतीमधील पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रांनी इतर विषयांच्या उत्तरपत्रिकांप्रमाणेच विद्यापीठात जमा करावयाच्या आहेत. सदर विषयांचे मूल्यांकन विद्यापीठाच्या केंद्रीय मूल्यांकन कार्यक्रम केंद्रात होईल. त्याचबरोबर अभियांत्रिकी व तांत्रिकी विद्याशाखेतील बी.आर्च सत्र-4 (सी.बी.सी.एस.) पध्दतीमधील परीक्षा योजनेत पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमाचा विषय दर्शविला नसल्यामुळे सदर विषयाची उन्हाळी-2025 ची लेखी परीक्षा अभियांत्रिकी व तांत्रिकी शाखेतील इतर अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात दर्शविल्यानुसार दि. 30 मे, 2025 रोजी सकाळी 9.00 ते 12.00 या वेळेत होईल. परीक्षा संचालनानंतरची पुढील कार्यवाही तरतुदीनुसार महाविद्यालयांनी करावी.
यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग यांना परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी याची तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी. तसेच विद्याथ्र्यांनी सुध्दा याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता परीक्षा विभागाच्या अधिका-यांशी विद्यापीठ वेबसाईटवरील त्यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.