सद्गुरूधाम गजानन महाराज मंदिराच्या विकासासाठी कटिबद्ध

दर्यापूर : तालुक्यातील वडनेर गंगाई येथील सद्गुरु धाम श्री संत गजानन महाराज मंदिराच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. मंदिराला शासनाचा क वर्ग दर्जा प्रस्तावित केल्याबद्दल डॉ.बोंडे यांचा विश्वस्त मंडळातर्फे सत्कार घेण्यात आला होता. दरम्यान ते बोलत होते.
यावेळी डॉ.वसुधा बोंडे, तिवस्याचे आमदार राजेश वानखडे, आमदार प्रताप अडसड, आरती राजेश वानखडे, माजी आमदार रमेश बुंदिले, छायाताई दंडाळे, गोपाल चंदन, मदन बायस्कार, रवींद्र ढोकणे, सरपंच गोकर्णा इंगळे, उपसरपंच मोहिनी हुतके, चंद्रशेखर हुतके, संस्थानचे अध्यक्ष अनिल गावंडे, रघुनाथ खलोकार, सुनील भांगे, प्रशांत गोडचर, धनंजय गावंडे, अविनाश नवलकार, मालाताई डोईफोडे, प्रकाश सित्रे, विनोद सोनटक्के, वसंत रेवस्कर, प्रमोद दहिभात, सुरेश जोध यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ.अनिल बोंडे म्हणाले, संस्थानला शासनाचा क वर्ग दर्जा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आगामी काळात या ठिकाणी सद्गुरूधाम मंदिराची भव्य वास्तू नावारूपास येईल. विविध प्रकारच्या सोयीसुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचाही आपला प्रयत्न असल्याचेही डॉ.बोंडे म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन विनोद सोनटक्के, प्रास्ताविक संस्थानचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केले.