LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

Shivsena UBT: शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर; ठाकरेंसाठी सगळ्यांना भिडणाऱ्या सुषमा अंधारेंना मोठी जबाबदारी

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अधिकृत प्रवक्ते जाहीर केले आहे. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या.

मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली, यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यप्रवक्ते-

  • खासदार संजय राऊत
  • खासदार अरविंद सावंत

प्रवक्ते-

  • शिवसेना नेते अॅड. अनिल परब
  • शिवसेना उपनेता प्रियंका चतुर्वेदी
  • शिवसेना जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान
  • शिवसेना उपनेता सुषमा अंधारे
  • आनंद दुबे
  • जयश्री शेळके

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पत्रात काय?
उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या. मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व शिवसेना नेते पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडत असतात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जयश्री शेळके यांच्यावरही शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी-
उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जयश्री शेळके यांच्यावरही शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी बचत गट चळवळीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उत्कृष्ट वक्ता म्हणून त्या परिचित असून सामाजिक विषयांवर त्यांची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली या राज्यांमध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक व्याख्याने झालेली आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारही होत्या. अवघ्या 841 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्या कायद्याच्या पदवीधर असून समाजकारण, राजकारण, कृषी, उद्योग, विधी, बचत गट, महिला, सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशी माहितीही पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!