परिचारीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार -राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे

अमरावती : महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे व राज्य उपाध्यक्ष शहजाद खान यांनी नुकतेच मंगळवारी, 8 एप्रिलला अमरावती जिल्ह्याला भेट देऊन येथील परिचारीका संघटना व सदस्यांच्या प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या तसेच त्या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर उपाययोजना, धोरण आखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्रीमती तोटे यांच्या अध्यक्षतेखाली येथील संघटनेच्या पदाधिकारी व परिचारीका सदस्यांसोबत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अमरावती परिचारीका संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वासनिक व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. संघटनेच्या पुढील वाटचाली संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्य, सभासदांचा वाटा, स्थानिक पातळीवरील समस्यांबाबत उपाययोजना तसेच राज्य पातळीवरील संघटनेची कामे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संघटनेचे पुढील धोरण व संभाव्य आंदोलनाची रुपरेषा याबाबत नियमित सभा घेण्याबाबत श्रीमती तोटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी श्रीमती तोटे व श्री. खान यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले सर ह्यांची भेट घेऊन परीचारिकेला काम करत असताना येणाऱ्या अडचणीबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे अधिष्ठाता डॉ. इंगोले यांनी ह्यांनी आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य श्री. राहुल लादे, श्रीमती मोनाली गजभिये, श्रीमती अंजली वर्धेकर, श्री. विशाल वडाळ, किशोर खोपे, श्रीमती आरती खानंदे, श्रीमती रंजना खोब्रागडे, शैलेश जोशी, श्रीमती तुलसी वाघमारे, श्रीमती शारदा कोलटके, श्रीमती रश्मी मुळे, श्रीमती प्रणाली डोंगरे, श्रीमती वर्षा सांगोळे यांच्यासह अन्य परिचारीका सदस्य उपस्थित होते.