Latest NewsMaharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भगवान महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई: तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिनाच्या निमित्ताने त्यांना भक्तिपूर्वक नमन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान महावीर यांचे जन्म कल्याणक पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृध्दी घेऊन येवो, अशी प्रार्थना करतानाच भगवान महावीर यांचे जीवन समाजाला सदैव प्रेरणा देत राहील. जगा व जगू द्या हा त्यांचा संदेश केवळ मानवतेसाठी नाही तर अखंड जीवसृष्टीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही त्यांनी दिलेली पंचशील तत्त्वे आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.