LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ, घैसासांच्या अडचणी वाढल्या; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने पाठवली नोटीस

पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) रुग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना गुरुवारी नोटीस बजावली आहे. डॉ. घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागवण्यात आला आहे. यामुळे आता डॉ. सुश्रुत घैसास यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यू झाला, या घटनेचे राज्यभर पडसाद उमटल्याचं दिसून आलं. गेल्या आठवड्यात एमएमसीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवून महिलेच्या उपचार प्रक्रियेत किती डॉक्टर सहभागी होते, याची माहिती मागवली होती.

त्यानंतर एमएमसीच्या नोटिसीला उत्तर देताना डॉ. घैसास या महिलेच्या उपचारात समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आलेल्या प्रतिसादाच्या आधारे एमएमसीने डॉ. घैसास यांना नोटीस पाठवली आहे. उद्या (रविवार, ता-13) पर्यंत डॉ. घैसास यांच्याकडून माहिती येणे अपेक्षित आहे. त्यानंतर मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी एमएमसीच्या कार्यालयात बोलवण्यात येईल, असे एमएमसीचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले.

भिसे परिवाराच्या सरकारपुढे 5 मागण्या
आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची भिसे कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. तनिषा भिसे यांचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता, तर तो व्यवस्थेतील दोष, असंवेदनशीलता आणि गैरजबाबदारीचं चित्र दाखवून गेला असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी भिसे परिवाराने दिली आहे.

सरकारकडे पुढे भिसे कुटुंबीयांनी ठेवल्या 5 मागण्या कोणत्या?

  1. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कठोर कारवाई

फक्त राजीनामा पुरेसा नाही, त्यांना तत्काळ बडतर्फ करून वैद्यकीय परवाना रद्द करावा, आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.

  1. खाजगी माहिती लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई

आमच्या कुटुंबाची आणि तनिषा भिसे यांची वैयक्तिक माहिती खोटी पद्धतीने पसरवणारे आणि अंतर्गत रिपोर्ट पब्लिक करणाऱ्यांवर डॉ. धनंजय केळकर डॉ. अनुजा जोशी, डॉ. समीर जोग, प्रशासक सचिन व्यवहारे आणि डॉ. सुश्रुत घैसास
यांच्यावर पोलीस व महिला आयोगकडून तात्काळ कठोर कारवाई

  1. पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक व चौकशी

ससून रुग्णालय समितीने पोलीस विभागाला त्वरीत अहवाल द्यावा, जेणेकरून संबंधित व्यक्ती देश सोडून पळून जाण्याआधी अटक होईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा

  1. रुग्ण सेवा प्रणालीची रचना – प्रत्येक हॉस्पिटलमध्ये

सरकारने प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक सेवा प्रणाली तयार करावी, जी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्व आवश्यक माहिती, योजनांबद्दल समज व सहकार्य देईल. हीच खरी तनिषा वाहिनींच्या बलिदानाला योग्य श्रद्धांजली असेल.

  1. राहिलेले अहवाल त्वरित जाहीर करावेत
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!