‘समता दौड’ मध्ये धावले विद्यापीठ व महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी
अमरावती – समता सप्ताहनिमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने आयोजित समता दौडमध्ये विद्यापीठ प्राधिकारिणी सदस्य, प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचायांसह विद्यापीठ तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभाग घेतला. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख पुतळा, पंचवटी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान ही ‘समता दौड’ काढण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे मार्गदर्शनाखाली समता दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी हिरवी झेंडी दाखवून प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ. ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. दौड दरम्यान श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे समता सप्ताहनिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, डॉ. आंबेडकरर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, डॉ. रविंद्र मुन्द्रे, डॉ. सुभाष गावंडे, डॉ. अर्चना बोबडे, डॉ. जागृती बारब्दे, दिल्ली येथील डॉ. प्रशांत रोकडे, विद्यापीठ रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, डॉ. दादाराव चव्हाण, श्री राहुल नरवाडे, डॉ. पंजाबराव देशमुख केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे डॉ. रत्नशील खोब्राागडे, डॉ. राजेश मिरगे, डॉ. मनिष गवई, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, श्री संदीप त्रिपाठी, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.