LIVE STREAM

AmravatiLatest NewsLocal News

समता प्रस्थापित करणारे महात्मा फुले थोर समाजक्रांतीकारक – डॉ. भिमराव वाघमारे

अमरावती – भारतीयांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय मिळावे.  देशात समता प्रस्थापित व्हावी, बहुजनांना शिक्षण मिळावे, स्त्रियांना सन्मान मिळावा, कष्टकरी व शेतकयांना न्याय मिळावा, यासाठी फुले दाम्प्त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.  आपल्या देशात समता प्रस्थापित करणारे महात्मा फुले थोर समाजक्रांतीकारक आहेत, अशी मांडणी विद्यापीठाचे माजी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. भिमराव वाघमारे यांनी केले.  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात समता सप्ताह निमित्ताने महात्मा फुले स्मारक समिती, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीतून ‘महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार व कार्य’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले, त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, अधिसभा सदस्य श्री राजेंद्र पांडे, केमिकल टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.के.बी. नायक, डॉ. किशोर राऊत व डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
                व्याख्यान विषयाची मांडणी करतांना डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, महात्मा फुले क्रांतीकारक होते.  त्यांचे काम जगाच्या पाठीवर असून ते खयाअर्थाने समाजक्रांतीचे आद्यक्रांतीकारक आहेत.  महात्मा फुले यांनी धार्मिक व तत्वज्ञानाचा अभ्यास केला.  सर्व शास्त्र, धर्मव्यवस्था ग्रंथ महात्मा फुलेंनी वाचले.  समाजात विषमता ही माणसांनीच निर्माण केल्याचे फुलेंनी सांगितले.  त्यामुळे अतिशुद्र आणि स्त्रियांसाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य खयाअर्थाने मानवी समानतेच्या स्वातंत्र्याचा पाया होता.
                समाजातील अज्ञान दूर व्हावे, महिलांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी भिडेंच्या वाड¬ात पहिली शाळा सुरु केली.  अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी स्वत:च्या घरची विहीर सार्वजनिक केली.  स्त्री-शिक्षणासह स्त्रियांना अधिकार मिळावेत, यासाठी फुले दाम्प्त्यांनी केलेले कार्य भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे.  महिलांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे निवेदन दिले होते.  फुले दाम्प्त्यांनी 35 ब्रााम्हण विधवांना आश्रय दिला. त्याकाळी महिलांवर अन्याय, अत्याचार होत असे, यासाठी पितृसत्ताक पद्धतीला त्यांनी विरोध केला.  दलित, शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांना त्यांची वाचा फोडली.  न्यायाधीशांनी वास्तविकतेवर निर्णय द्यावा, यासाठी आंदोलने केलीत.
                महात्मा फुले व बाबासाहेबांनी समाजासाठी दिलेल्या बलिदानाची फलश्रृती विषयी ते म्हणाले, आज महिला मोठमोठ¬ा पदांवर विराजमान आहेत.  बहुजन शिकू शकलेत, आज ते देशाच्या विकासामध्ये योगदान देत आहेत.  पण आज महिला फुले दाम्प्त्यांचे विचार विसरल्यात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्यांचे अनुयायी विसरलेत, पण बाबासाहेबांनी फुलेंची सत्यशोधक मोहीम पुढे नेली.  समतेवर आधारित समाजाची वीण घट्ट होण्यासाठी फुलेंच्या व बाबासाहेबांच्या विचाराचे सर्वांनी वाहक व्हावे, असा उपदेशही त्यांनी याप्रसंगी दिला.
               याप्रसंगी अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  अध्यक्षीय भाषणात डॉ. मोना चिमोटे म्हणाल्या, फुले, गांधी व बाबासाहेबांच्या कार्याची उपलब्धी म्हणजे आज महिलांना सर्वच क्षेत्रात मानाचे स्थान मिळाले आहे.  ब्रिाटीशांनी शिक्षणाला या देशात चालना दिली.  महात्मा फुले यांनी सुद्धा मिशनरीच्या शाळेत शिक्षण घेतले.  या देशातील मानसिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी महात्मा फुले पुढे आलेत.  सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी खांद्याला खांदा लावून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी लढा दिला.  फुले दाम्प्त्यांनी स्त्रींच्या अत्याचारावर वाचा फोडली.  स्त्रियांना सन्मान मिळवून दिला.  महात्मा फुले यांच्या जीवन व कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असेही त्या म्हणाल्यात.
               विद्यापीठ गीताने सुरु झालेल्या कार्यक्रमात अतिथींच्या हस्ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत गाडगे बाबा व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.  पाहुण्यांचे शाल व रोपटं देवून स्वागत करण्यात आले.  डॉ. किशोर राऊत यांनी प्रास्ताविक भाषणातून व्याख्यान आयोजनामागील भूमिका विषद केली.  संचालन प्रा. रोहिणी देशमुख यांनी, तर आभार प्रा. सुरेश पवार यांनी मानले.  कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, डॉ. देवलाल आठवले, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे डॉ. रत्नशील खोब्राागडे, विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!