LIVE STREAM

AmravatiIndia NewsLatest News

अमरावतीच्या सुपुत्राची सर्वोच्च झेप! भूषण गवई ठरणार देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर भारताचे 52 वे सरन्यायाधीश बनणार आहेत. बुधवारी 14 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून त्यांना शपथ दिली जाईल. न्यायमूर्ती एम. हिदायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनमधील आणखी एक सदस्य न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळणार आहे.

मुंबईत वकिलीला सुरुवात नंतर नागपूरला स्थायिक
भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला. लोकप्रिय वकील आणि सामान्य माणसांशी नाळ जुळलेले न्यायाधीश गवई यांच्या ठिकाणी कायद्याचे ज्ञान, नेतृत्वगुण आणि न्यायमूर्तीपदाचा अनुभव असा त्रिवेणी संगम दिसून येतो. 1990 मध्ये बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायमूर्ती गवई यांनी मुंबईत वकिली पेशात काम करण्यास सुरुवात केली आणि नंतर ते नागपूरला स्थायिक झाले.

न्यायमूर्ती भूषण गवई यांची कारकीर्द-

  • न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला.
  • 16 मार्च 1985 रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता आणि माजी न्यायाधीश राजा एस. भोसले यांच्यासोबत 1987 पर्यंत काम केले.
  • 1987 ते 1990 पर्यंत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली केली.
  • 1990 नंतर, मुख्यतः मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर न्यायमूर्ती भूषण गवई यांनी वकिली केली.
  • न्यायमूर्ती भूषण गवई हे नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते.
  • ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाली.
  • 17 जानेवारी 2000 रोजी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाली.
  • 14 नोव्हेंबर 2003 रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांना बढती मिळाली.
  • 12 नोव्हेंबर 2005 रोजी न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.
  • नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलं आहे.
  • 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झाली.
  • यापूर्वी संजीव खन्ना यांच्या आधी सरन्यायाधीश पद भूषवणारे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सुद्धा महाराष्ट्राचेच होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!