शॉकिंग! पुण्यातील बेपत्ता तरुणीचा मृतदेह भीमा नदीपात्रात विच्छिन्न अवस्थेत; तरुणासोबत दुचाकीवर जातानाचे CCTV समोर

Pune: पुण्यातील राजगुरुनगर येथून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाविद्यालयात जाते म्हणून सांगून गेलेली तरुणी कालपासून बेपत्ता होती. मात्र आज तिचा मृतदेह भीमा नदीपात्रात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाविद्यालयातून ही तरुणी एका तरुणासोबत दुचाकीवरून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडल्याने तरुणीचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात पिडित अल्पवयीन मुलीच्या डोक्यात अन तोंडावर गंभीर दुखापत असल्याचं आढळलं. दुचाकीवरून घेऊन जाणारा तरुण नेमका कोण? अल्पवयीन मुलीची हत्या नेमकी कोणी अन का केली? याचा तपास खेड पोलीस करतायेत.
नक्की काय झाले?
पुण्यातील राजगुरुनगर येथील महाविद्यालयीन तरुणी काल बेपत्ता झाली होती. मात्र आज या महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीपात्रात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात आढळला असून पोलीस तपासात तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले आहे. महाविद्यालयात गेलेली मुलगी गावातील एका तरुनसोबत दुचाकीवरुन गेल्याचे सीसीटीव्ही कँमेरात कैद झाले आहे. काल गायब झालेल्या या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज भीमा नदी पात्रात आढळल्यानं खळबळ उडाली होती. यावरून ही हत्या असल्याचा अन पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने नदीत फेकून दिल्याचा अंदाज आहे. तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली. तरुणीचा शोध घेत असताना भीमा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह असल्याचं स्थानिकांनी स्पष्ट केलं. पोलिसांनाही माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात तपास केला. या तपासांतर्गत तरुणीच्या डोक्यात व तोंडावर जबर मार व दुखापत झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पीडित तरुणीचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज खेड पोलिसांनी वर्तवलाय.