हादरवून टाकणारी बातमी, दोन जिवलग मित्रांची झाडाच्या एकाच फांदीला गळफास लावून आत्महत्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना जामखेडमधून पिंपरी चिंचवड येथे घडली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडामधल्या दोन मित्रांनी पिंपरी चिंचवडच्या मोशी मध्ये एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी 12 एप्रिल रोजी ही घटना उघड झाली. तुषार ढगे आणि सिकंदर शेख असं आत्महत्या केलेल्या मित्रांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाईकांचा शोध लागला असून त्यांच्या नातेवाईकांना घटनेबद्दल माहिती देण्यात आली आहे.
जिवलग मित्र
तुषार अशोक ढगे आणि सिकंदर सल्लाउद्दीन शेख वय अनुक्रमे 25 आणि 30 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे राहत होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे दोघे एकमेकांचे मित्र असून काल मूळ गावावरून पुण्याला आले होते. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी या ठिकाणी एका लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला 12 एप्रिल रोजी गळफास घेतला आहे. दोघांच्या मृत्यूची चौकशी करीत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या दोघांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी? याचं कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मोशीतील निर्जनस्थळी दोघांनी एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेतल्यानं हळहळ व्यक्त केली जातीये. ते जामखेडवरुन मोशीत कधी आले? कशासाठी आले? अन आत्महत्या का केली? याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.