LIVE STREAM

Crime NewsLatest News

Varanasi gang rape case: वाराणसीत बड्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आरोपींच्या मोबाईल मधून 546 मुलींचे अश्लील फोटो अन् व्हिडिओ; महाराष्ट्रासह सहा राज्याचं कनेक्शन

वाराणसी : येथील सामूहिक बलात्कारप्रकरणातून एका मोठ्या सेक्स रॉकेट उघड झालं आहे. या प्रकरणी अटक केलेल्या 12 आरोपींच्या मोबाइलमध्ये 546 मुलींचे नग्न व अश्लील व्हिडीओ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या मोबाइलवर हे व्हिडीओ शेअर केले आहेत, त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह सहा राज्यांमध्ये आढळून आले आहे. या घटनेतील प्रमुख सूत्रधार व कांटिनेटल कॅफेचा मालक अनमोल हा उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल व तामिळनाडूत मुली पाठवत होता, अशी माहिती समोर आली आहे. गुप्ताच्या आयफोनमध्येही मुलींचे अश्लील व्हिडीओ आढळून आले. यातील बहुतांश व्हिडीओ कांटिनेटल कॅफेमध्ये बनवण्यात आले होते.

वाराणसीमध्ये 23 नराधमांनी अत्याचार झालेल्या सामूहिक बलात्कार पीडितेच्या प्रकरणाचा तपास आता सेक्स रॅकेटकडे वळला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या 23 पैकी 12 मुलांचे मोबाईल फोन तपासले तेव्हा त्यांना 2-4 नाही तर 546 मुलींचे नग्न व्हिडिओ आणि फोटो आढळले. इतकंच नाही तर ज्या लोकांसोबत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे त्यांचे लोकेशन उत्तर प्रदेशसह इतर सहा राज्यांमध्ये आढळले आहे. या सामूहिक बलात्काराचे धागेदोरे केवळ 23 आरोपींपुरते मर्यादित नाहीत तर ते सहा राज्यांशी जोडलेले आहेत.

सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड
या गुन्ह्याचा सूत्रधार अनमोल असल्याचे सांगितले जात आहे, ज्याला अटक करण्यात आली आहे आणि तो एका कांटिनेटल कॅफेचा मालक आहे. अनमोल गुप्ता यांच्याकडून जप्त केलेल्या दोन मोबाईल फोनमध्ये मुलींचे सर्वात आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळले. हे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवरून डाउनलोड केलेले नाहीत तर त्यांच्या कांटिनेटल कॅफेमध्ये बनवलेले आहेत. पोलिसांनी त्यांना फॉरेन्सिक तपासणीसाठी आग्रा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले आहे. तो हे नग्न फोटो आणि व्हिडिओ त्याच्या ग्राहकांना पाठवत असे आणि जुन्या ग्राहकांपासून नवीन ग्राहक निर्माण करण्यासाठी एक चैन चालवत होचा. कारण एकाच्या मोबाईल फोनमध्ये एक डेटाशीट देखील सापडली आहे.

अनमोलचे वडील सेक्स रॅकेट चालवायचा
चौकशीदरम्यान, अनमोलने पोलिसांना सांगितले की त्याचे वडील शरद गुप्ता देखील सेक्स रॅकेटचा भाग आहेत. 2022 मध्ये अनमोलला त्याचे वडील शरद गुप्ता यांच्यासह सेक्स रॅकेट चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेले सर्व आरोपी ड्रग्ज व्यसनी आहेत.vअटक केलेले सर्व आरोपी कॅफेशी संबंधित आहेत. आरोपींपैकी एक कोल्ड्रिंक्स एजन्सी चालवतो आणि दुसरा हर्धा येथील एका दुकानात काम करतो. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की अटक केलेले 12 जणही ड्रग्ज व्यसनी आहेत.

29 मार्च रोजी बेपत्ता झालेली मुलगी 4 एप्रिलला आढळली

पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, 29 मार्च रोजी त्यांची मुलगी अचानक बेपत्ता झाली तेव्हा त्यांनी तिच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांच्या ठिकाणी तिचा शोध घेतला. पण काही दिवसांनी, 4 एप्रिल रोजी, पोलिसांनी त्याच्या मुलीला घरी आणले. तिची प्रकृती खूप वाईट होती, ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. 48 तासांनंतर ती सामान्य झाली आणि 6 दिवस ती खूप घाबरली. तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की, विद्यार्थिनीला ड्रग्ज देऊन नशेत ठेवण्यात आले होते आणि तिच्यावर 6 दिवस सतत बलात्कार करण्यात आला. पोलिसांना असेही आढळून आले की मास्टरमाइंड अनमोलने त्याच्या कॉन्टिनेंटल कॅफेद्वारे 15 मुलांना त्याचे एजंट म्हणून नियुक्त केले होते जे मुलींशी मैत्री करायचे आणि त्यांना प्रेमात अडकवायचे.  मग ते त्यांच्यावर बलात्कार करायचे आणि त्यांना ब्लॅकमेल करायचे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!