AmravatiLatest News
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे तर्फे संविधान उद्देशिका व ग्रंथ वितरण

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विद्यापीठाच्यावतीने हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच याठिकाणी असलेल्या स्टॉलवरुन भारतीय संविधान उद्देशिका व ग्रंथांचे वितरण कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते उपस्थित नागरिकांना करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. मनिषा कोडापे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे, अधिसभा सदस्य डॉ. प्रशांत विघे, डॉ. जागृती बारब्दे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड आदी उपस्थित होते.