भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यापीठाच्यावतीने अभिवादन

अमरावती: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने महत्वपूर्ण देणगी देशाला दिली आहे. संविधानात चेक्स अॅन्ड बॅलन्स सिस्टीम दिली असून आपल्या देशात संविधान विरोधी कुठलीही कृती करता येत नाही. नागरिकांना दिलेले हक्क अबाधित ठेवण्यासाठी संविधान महत्वपूर्ण कायदा आहे. देशात समानता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने बाबासाहेबांनी कार्य केले असून त्यांच्या विचार व कार्याचे अनुकरण करुन आपल्या देशाच्या विकासामध्ये हातभार लावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठातील संविधान शिल्प या ठिकाणी आयोजित अभिवादन सोहळा कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून निवासी जिल्हाधिकारी श्री अनिल भटकर, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुन्द्रे, प्रा. श्रीकांत काळीकर, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, कायद्यानुसार देश चालावा, अशी संविधानात तरतूद आहे. या तरतूदीचे कुणी उल्लंघन केल्यास त्याविरुद्ध उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्याय मागता येतो. संविधानाने सर्व भारतीयांना अधिकार दिले आहेत. सुदृढ लोकशाहीमुळे सर्व भारतीय गुण्यागोविंदाने जीवन जगत आहे. भारताच्या विकासाची गती झपाट¬ाने पुढे जात असून नक्कीच आपण जगात वि·ागुरु होवू, असा वि·ाास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
प्रमुख अतिथी श्री अनिल भटकर म्हणाले, बाबासाहेब केवळ अस्पृश्याचे असल्याचा चुकीचा समज पसरविला गेला. बाबासाहेब सर्व भारतीयांचे असून भारताच्या विकासासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. सर्व समस्यांवर त्यांनी उपाय दिलेले आहेत. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असे सांगून जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
यावेळी प्रा. श्रीकांत काळीकर यांनी बाबासाहेबांचे विचार तळागाळातील सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. बाबासाहेबांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी व आपापल्या परीने देश विकासामध्ये योगदान द्यावे, असे डॉ. रविंद्र मुन्द्रे म्हणालेत.