LIVE STREAM

India NewsLatest News

मोठी बातमी: गुजरातच्या समुद्रात तब्बल 1800 कोटींचा ड्रगसाठा असणारी बोट पकडली, मासेमारीच्या नावाखाली मोठं रॅकेट

गुजरात : गुजरातच्या समुद्रात कोस्ट गार्ड आणि गुजरात ATS च्या संयुक्त कारवाईत तब्बल 1800 कोटी रुपयांचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली आहे. सुमारे 300 किलो MD ड्रग्ज या बोटीतून जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर समुद्रात करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही बोट रात्रीच्या अंधारात समुद्रातून पाकिस्तानच्या दिशेने भारतात येत होती, अशी प्राथमिक माहिती आहे. कोस्ट गार्डच्या स्पीड बोट्स आणि मोठ्या जहाजांनी सिनेमा स्टाईल कारवाई करत ही बोट थांबवली आणि तिची कसून तपासणी केलीय.बोटीत सापडलेली ड्रग्स ही मेथॅम्पेटामिन (MD ड्रग्स) असल्याचं समोर आलं आहे.ही अत्यंत घातक आणि महागडी ड्रग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये आहे.

रात्रीच्या अंधारात ड्रग्ज समुद्रात फेकून पळ काढणार तोच…
12 आणि 13 एप्रिल रोजी रात्री करण्यात आलेल्या या कारवाईत तटरक्षकाला रात्रीच्या काळोखात एक संशयित बोट जवळ येत असल्याचे आढळले. सतर्क झालेल्या तटरक्षकाने संशयित बोटीचा पाठलाग केला असता तटरक्षक दलाच्या पथकाला समुद्रात टाकण्यात आलेले अंमली पदार्थ आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील तपासणीसाठी आयसीजी जहाजाने पोरबंदरला आणण्यात आले आहेत.त्यांनी गुजरात ATSच्या मदतीने ही ऑपरेशन राबवली. कारवाईदरम्यान बोटीत असलेल्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

मासेमारीच्या नावाखाली ड्रग्जची वाहतूक
तब्बल 1800 कोटी रुपयांचे ड्रग्ज असणारी मासेमारी बोट पश्चिम बंगालमधील काकद्वीप मासेमारी बंदरात नोंदणीकृत होती. तपासणी दरम्यान, ती वैध नोंदणी कागदपत्रांशिवाय असल्याचे आढळून आले. याव्यतिरिक्त, जहाजावरील 14 भारतीय क्रू सदस्यांपैकी एकाही सदस्याकडे मासेमारीसाठी अनिवार्य असणारी अधिकृत कागदपत्र नव्हती.जहाजातील कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांपासून समुद्रात असल्याचा दावा केला असला तरी बोटीत मासेमारीचे कोणतेही साहित्य नव्हते आणि मासे पकडण्याचे साधनही आढळले नाही. त्यामुळे गुजरात ATS आणि कोस्ट गार्डच्या संयुक्त कारवाईत सापडलेली बोट तस्करीसाठीच वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!