AmravatiLatest NewsLocal News
विद्यापीठ परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान भव्यदिव्य समता तथा संविधान जनजागृती रॅली

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने विद्यापीठ परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, निवासी उपजिल्हाधिकारी श्री अनिल भटकर, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, अधिसभा सदस्य डॉ. रविंद्र मुन्द्रे, प्रा. श्रीकांत काळीकर, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी पुष्पार्पण करुन रॅलीला सुरुवात झाली. तत्पूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व मेणबत्तीप्रज्वलन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांचे शुभहस्ते करण्यात आले. भव्यदिव्य अशा रॅलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व संविधान मुखपृष्ठाचे फलक हे रॅलीचे वैशिष्ट¬ होते. रॅलीमध्ये ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणा देत रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहोचली. यावेळी विद्यापीठ प्राधिकारिणींचे सदस्य, प्रशासकीय व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.