विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून साहित्य व सहयोग राशी सामाजिक संस्थांना प्रदान

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती पर्वावर 14 एप्रिल, 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील कार्यक्रमात साहित्य व सहयोग राशी सामाजिक संस्थांना प्रदान करण्यात आली. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले वाचनालय, अमरावती यांना रू. 11 हजार किंमतीचे ग्रंथ, दीशा फाऊंडेशन, अमरावती या असुरक्षित मुलांचे सामुदायिक केंद्र चालविणाया संस्थेस रू. 20 हजार सहाय्य राशी आणि बौद्ध धम्म प्रचार समिती, भिमटेकडी येथील ग्रंथालयास एक स्टील बुक रॅक प्रदान करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पदाधिकायांकडून साहित्य व सहयोग राशी स्वीकारली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, उपाध्यक्ष श्री मंगेश वरखेडे, सचिव डॉ. रत्नशील खोब्राागडे, सहसचिव श्रीकांत तायडे, कोषाध्यक्ष प्रेम मंडपे, सदस्य डॉ. प्रेमानंद तिडके, डॉ. अनिता पाटील, संतोष वानखडे, मिलींद मेश्राम, भिमराव वाठोरे व कैलास राठोड उपस्थित होते.