श्री गुरुसिंग सभा ( गुरुद्वारा ), राजापेठ च्या कार्यकारिणीच्या वतीने सिरोपा देऊन आमदार – सुलभा खोडके यांचा सत्कार*

अमरावती : वैशाखी, ज्याला बैसाखी असेही म्हणतात, हा वैशाख महिन्याचा पहिला दिवस असतो आणि पारंपरिकपणे दरवर्षी 13 एप्रिल आणि कधीकधी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने पंजाब आणि उत्तर भारतात वसंत ऋतुतील कापणीचा उत्सव म्हणून पाहिला जातो. जरी तो कापणीचा उत्सव म्हणून पाहिला जातो. जरी तो कापणीचा सण म्हणून सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा असला तरी, भारतात अनेक भागामध्ये, वैशाखी ही पीक कापणीची तारीख देखील आहे. वैशाखी हा खूप महत्वाचा पंजाबी सण आहे. खालसा हा शब्द शीख धर्माचे पालन करणाऱ्या समुदायाला तसेच दीक्षित शिखाचा एक विशेष गट यांना सूचित करतो. खालसा परंपरेची सुरुवात 1699 मध्ये शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोबिंदसिंग यांनी केली होती. त्याची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. खालसाची स्थापना शीख लोक अर्थात समाज बांधव वैशाखी च्या सणात साजरी करतात.अशातच अमरावती येथे राजापेठ बुटी प्लॉट परिसर स्थित श्री गुरुसिंग सभा (गुरु द्वारा )येथे बैसाखी चे पावन पर्वावर विविध कार्यक्रमाचे दरवर्षी प्रमाणे भव्य आयोजन करण्यात आले.बैसाखीच्या निमित्ताने आमदार सौ. सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी श्री गुरुसिंग सभा (गुरुद्वारा ) येथे भेट दिली. यादरम्यान त्यांनी श्री गुरु ग्रंथसाहिब चे दर्शन घेण्यासह तिथे नतमस्तक होऊन श्री गुरु चरणी विश्वमांगल्याची प्रार्थना केली.याप्रसंगी श्री गुरुसिंग सभा, बुटी प्लॉट -राजापेठ, अमरावती च्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी आमदार सौ. सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांचा सिरोपा देऊन यथोचित सत्कार केला. यासोबतच स्थानिक परिसरात संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व कार्यक्रम आदींची विस्तृतपणे माहिती देण्यात आली. याप्रसंगी आमदार – सौ. सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी सर्व शीख बांधव व भगिनींना बैसाखी सणाच्या पावन पर्वावर शुभेच्छा दिल्या. यावेळी ” वाहे गुरुजी का खालसा – वाहे गुरुजी की फतेह ” तसेच ” बोलें सो निहाल – सत श्री अकाल ” च्या गगनभेदी घोषणानी आसमंत दणाणून गेला होता.याप्रसंगी श्री गुरुसिंग सभा, बुटी प्लॉट, राजापेठ, अमरावती 2025-2026 कार्यकारिणी चे चयनीत अध्यक्ष -अमरज्योतसिंग जग्गी, कार्यकारी अध्यक्ष – रविन्द्रसिंग उर्फ बिट्टूसेठ सलुजा, सचिव -प्रा. डॉ. निक्कूसिंग खालसा, कोषाध्यक्ष-सोनू बग्गा, माजी महापौर -रीना नंदा आदिन्सह पूर्व पदाधिकारी व बहुसंख्य शीख समाज बांधव व भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.