LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध परिसरात स्‍वच्‍छतेची कार्यवाही

अमरावती: अमरावती शहराला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक आता सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या अधिक कठोर कारवाई करणार आहे. उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी उपद्रव शोध पथकांना उपरोक्त निर्देश दिले.

उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघवी करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर सुद्धा कारवाई करणे गरजेचे असल्याचे सांगितले. नागरिकांनी किंवा दुकानदारांनी कचरा गाडीवाला स्वच्छता दूताला दिला तर बाजारपेठेत स्वच्छता राखण्यात मोठी मदत होईल. त्यांनी नागरिकांना स्वच्छता ऍपचा सुद्धा वापर करण्याचे आवाहन केले. नागरिकही आपल्या मोबाईलवर ॲप डाउनलोड करून आपली तक्रार नोंद करू शकतील. या तक्रारीचे निवारण मनपातर्फे लवकरात लवकर केले जाईल.

त्यांनी सांगितले की, शोध पथकाचा माध्यमाने नागरिकांमध्ये आणि दुकानांमध्ये जनजागृती केली जाईल. त्यांना स्वच्छता ॲप आणि उपद्रव शोध पथकाच्या दंडाच्या रक्कमेची कल्पना दिली जाईल. यानंतरही बाजारपेठेत कचरा दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यांनी दुकानदारांना आपल्या दुकानात हिरवी आणि निळी कचरा कुंडी ठेवण्याचे आवाहन केले. या कचरा कुंड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा गोळा केला जाईल. शहरातील सर्व नागरिकांनी जबाबदारपणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे ठरविल्यास अमरावती शहर सुद्धा स्वच्छता रँकिंगमध्ये उच्चांक गाठू शकतो. अमरावती महानगरपालिकेच्‍या वतीने विविध परिसरात स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे.
मध्‍य झोन क्रमांक २ राजापेठ प्रभाग क्रमांक १३ अंबापेठ, गोरक्षण प्रभाग अंतर्गत साफ सफाई कंत्राटदार यांच्या द्वारे साफ सफाई कामे करुण घेण्‍यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्‍य चित्रा चौक येथे पुतळा परिसराची साफ सफाई करण्‍यात आली. सदर साफ सफाई कामाची पाहणी वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव व ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे यांच्या द्वारे करण्यात आली. जागो-जागी पडलेले कच-याचे ढीगारे उचलण्‍यात आले. कंटेनर परिसर ची साफ सफाई करण्‍यात आली. सर्व मुख्य रस्ते साफ सफाई करुण कचरा उचलण्‍यात आला. तसेच मच्छर फ़वारणी करण्‍यात आली. स्‍थायी सफाई कामगार यांच्या द्वारे मुधोड़कर पेठ येथे साफ सफाई करण्‍यात आली.
महानगरपालिका उपायुक्त (प्रशा.) डॉ.मेघना वासनकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव यांच्‍याद्वारे दिनांक ११/०४/२०२५ रोजीच्‍या सभेत प्राप्त सूचना नुसार मनपा सफाई कामगाराद्वारे हनुमान जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍ताने मंदिर परिसर व विहार परिसराची साफ सफाई करण्‍यात आली.
प्रभाग क्र.२० सूतगिरणी अंतर्गत हनुमान जयंती निमित्य मंदिर परिसराची साफ सफाई करण्‍यात आली.
मध्‍य झोन क्रमांक २ राजापेठ प्रभाग क्रमांक १३ अंबापेठ, गोरक्षण प्रभाग अंतर्गत साफ सफाई कंत्राटदार यांच्या द्वारे साफ सफाई कामे करुण घेण्‍यात आले. श्री हनुमानजी जन्मोत्सव निमित्‍त प्रभाग अंतर्गत हनुमान मंदिर परिसराची साफ सफाई करण्‍यात आली. सदर साफ सफाई कामाची पाहणी ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक विजय बुरे यांच्या द्वारे करण्यात आली. जागो-जागी पडलेले कच-याचे ढीगारे उचलण्‍यात आले. कंटेनर परिसर ची साफ सफाई करण्‍यात आली. सर्व मुख्य रस्ते साफ सफाई करुण कचरा उचलण्‍यात आला व मच्छर फ़वारनी व धुवारणी करुण घेण्‍यात आली. मंदिर परीसरातुन जमा केलेले डोने, पत्रवाडी ऑटोद्वारे उचलण्‍यात आले.
प्रभाग क्र.७ जवाहर स्टेडियम मध्ये डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त इर्वीन चौक येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव व जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक विजय बुरे यांच्या उपस्थितीमध्ये सदर ठिकाणी पाहणी करण्यात आली.
राजापेठ परिसरातील भारतीय कॉलेज समोर, रस्ते दुभाजकला लागून मुख्य रस्त्यावर झाडाची मोठी फांदी पडलेली असून सदर कार्यवाही उद्यान विभागाकडून करण्‍यात आली.
प्रभाग क्र.६ विलास नगर मध्ये मेन रोड प्रमुख रस्ते, छोटे रस्ते, चौक, दुभाजक (डिवायडर)चे साफ सफाईचे काम करण्‍यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे व जेष्‍ठ स्वास्थ निरीक्षक शारदा गुल्हाने यांच्‍याद्वारे प्राप्त निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम व रॅली निमित्‍ताने प्रभाग क्र.२२ नवीबस्ती बडनेरा अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर ची मनपा सफाई कामगाराद्वारे साफ सफाई व कंत्राटी कामगाराद्वारे कच-याचे ढिगारे उचलण्‍यात आले.
मा.वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे यांच्या प्राप्त निर्देशाद्वारे प्रभाग क्रमांक २० मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुख्य रस्ते तसेच विहार याची साफ सफाई करून घेण्यात आली.
झोन क्र.१ रामपुरी कॅम्प प्रभाग क्र.३ नवसारी मध्ये डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महात्मा फुले नगर वलगाव रोड, नवसारी गाव, सिद्धार्थ नगर, प्रवीण नगर या परिसराची साफ सफाई करण्‍यात आली. सदर ठिकाणी जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु ढिक्याव, म.न.पा व कंत्राटी सुपरवाईजर उपस्थित होते.
झोन क्र.५ भाजीबाजार प्रभाग क्र.१७ गडगडेश्वर अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गडगडेश्वर परिसरातील माताखिडकी, गांधी आश्रम, महाजनपुरा, खोलापुरी गेट गणेश दादा गायकवाड यांच्या घरासमोर रोड ची साफ सफाई करण्‍यात आली.
प्र.क्र.२१ जुनी वस्ती अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने परीसरात व कार्यक्रम स्थळी सफाई करण्‍यात आली.
झोन क्रं.३ दस्तूरनगर प्रभाग क्र.११ फ्रेजरपुरा अंतर्गत मा.आयुक्त, मा.अतिरिक्त आयुक्त, मा.उपायुक्त (प्रशा.) यांनी दिलेल्या आदेशानुसार व वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता), सहाय्यक आयुक्त झोन क्र.३ यांच्या निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रभागातील जयंती कार्यक्रम स्थळी व रॅली मार्ग ठिकाणी साफ सफाई करुन सदर कार्यक्रम स्थळी फवारणी करण्‍यात आली.
प्र.क्र.२० सूतगिरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने चवरे नगर परीसरात व कार्यक्रम स्थळी सफाई करण्‍यात आली.
प्रभाग क्र.१६ अलीम नगर अंतर्गत तक्रारी नुसार रहमत नगर येथील सलीम पानठेले वाले येथील नाली ची स्‍वच्‍छता करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!