LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

अवैध रेती माफियावर पोलिसांची मोठी कारवाई 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

धारणी – पोलिसांनी चाकरदा गावाजवळ अवैध रेती माफियांच्या विरोधात मोठी धडक कारवाई केली असून २ ट्रॅक्टरसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत अवैधपणे रेतीची चोरी केल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या आदेशावरून, ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस अंमलदार नितीन बहुरसिया, मोहित आकाशे, जगत तेलगोटे, रितेश देशमुख, आणि अनुराग कथिलकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास PSI ईश्वर सोळंके करत आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी :
राजू रिंगा मावसकर वय 36

प्रेमचंद तोता राम डहाके वय 24

पोलिसांच्या या कारवाईने स्थानिक रेती माफियामध्ये घबराट पसरली असून, तपास यंत्रणांनी पुढील आरोपींचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!