आचार्य पदवी (पेट – 2025) प्रवेश परीक्षेसाठी आवेदनपत्र भरण्यास 23 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

अमरावती : विद्यापीठाव्दारे आचार्य पदवीकरिता संशोधन करु इच्छिणा-या संशोधक विद्याथ्र्यांची आचार्य पदवीपूर्व परीक्षा विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात येत आहे. ज्या विद्याथ्र्यांना आचार्य पदवीसाठी संशोधन करावयाचे आहे, त्यांना आचार्य पदवीपूर्व (पेट – 2025) परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 01 ते 15 एप्रिल, 2025 दरम्यान मुदत देण्यात आली होती. परंतु विद्याथ्र्यांच्या अडचणी लक्षात घेता आचार्य पदवी प्रवेश परीक्षा – 2025 समितीने घेतलेल्या निर्णयानुसार दि. 23 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आचार्य पदवी परीक्षेचे अर्ज दि. 16 ते 23 एप्रिल पर्यंत विद्याथ्र्यांना सादर करता येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी कळविले आहे.
तरी विद्याथ्र्यांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.