धारणी पोलिसांची अवैध रेती माफियावर मोठी कारवाई २४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
धारणी– पोलीसांनी अवैध रेती तस्करीवर मोठा आघात केला आहे. मध्यरात्री तापी नदीपात्रातून बैरागड परिसरातून येणाऱ्या अवैध रेतीच्या खेपेला पोलिसांनी दिया फाटा येथे सापळा रचून अटकाव केला. या कारवाईत तब्बल २४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह चार तस्करांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार, ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस अंमलदार मोहित आकाशे, सतीश झाल्टे, मनोज लडे, आणि जगत तेलगोटे यांनी मोलाचे योगदान दिले.
अटक करण्यात आलेले आरोपी :
शेख समीर शेख शमीम
शेख शफीक शेख शमीम
रुपेश गंगाराम बारेला
शेख जुबेर शेख इक्राम
सर्व आरोपी बैरागड येथील रहिवासी
सध्या पुढील तपास सुरू असून, या अवैध रेती तस्करीत आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या या कडक संदेशामुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.