“अमरावतीत पोलिस दलाला मिळाल्या अत्याधुनिक सुविधा

अमरावती (कोंडेश्वर):
अमरावती जिल्ह्यातील कोंडेश्वर परिसरात अमरावती ग्रामीण पोलिस दलासाठी नव्या अत्याधुनिक सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.
या अंतर्गत नवीन पोलीस निवासस्थान, वातानुकूलित वाहतूक कक्ष, महिला विश्रांतीगृह, प्रशासकीय इमारत आणि १८ चारचाकी नवीन वाहने ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “पोलीस दलाचे आधुनिकीकरण हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ही साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे आणि भविष्यात आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधने पुरवली जातील.”
👥 उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती
या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, व इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.