अकोला : पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची बजरंगदलाची मागणी

अकोला : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात आज बजरंग दलाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं. हिंदूंना लक्ष्य करून केलेल्या हिंसाचाराविरोधात आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडलं. आंदोलनादरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. बजरंग दलाच्या सूरज भगेवार यांनी सांगितलं की, ‘वक्फ कायद्याच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवर संगनमताने हल्ले केले जात आहेत. दंगली पेटवल्या जात आहेत. ही स्थिती अतिशय गंभीर असून, तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करणे अत्यंत गरजेचे आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये, ‘पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करावं, हिंसाचार थांबवावा, आणि हिंदू समाजाच्या जीवित व मालमत्तेची सुरक्षा सरकारने तातडीने सुनिश्चित करावी,’ अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.