LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावतीकरांच्या सर्व प्रिय संगीत साधनाचा तिसरा वर्धापन दिन

अमरावती : आपल्या अमरावती शहरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भात सुप्रसिद्ध व सूपरिचित असलेला सर्वप्रथम कराओके क्लब म्हणजे संगीत साधना कराओके क्लब. आपल्या गरमा-गरम नाश्त्यांने व अनेक स्वादिष्ट मिष्ठान्ने व व्यंजने यांनी सर्वांना भुरळ घालणाऱ्या रघुवीरचे सर्वेसर्वा चंद्रकांत पोपट यांनी त्यांना स्वतःला गाण्यांची अतिशय आवड असल्यामुळे स्वतःच्या कलोपासनेकरिता व त्यासोबतच अमरावती शहरातील नवोदित गायकांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याकरिता संगीत साधना कराओके क्लब ची स्थापना केली. 

आज २२ एप्रिल २०२५ रोजी संगीत साधना कराओके क्लब ला तीन वर्षे पूर्ण होऊन संगीत साधना आपला तिसरा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करीत आहे. 

संगीतामध्ये दडलेली अद्भुत दिव्यशक्ती आपणा सर्वांनाच परिचित आहे. एखाद्या कोमात गेलेल्या माणसाला त्याच्या आजारातून बाहेर काढण्याची शक्ती संगीतात आहे. रडणाऱ्या बालकांना, हंबरणाऱ्या गाई वासरांना शांत करण्याची शक्ती संगीताता आहे. आपल्या अमरावतीकरांकरिता अत्याधुनिक साऊंड व सोयी सुविधा असलेल्या या क्लब ची निर्मिती करून चंद्रकांतभाऊंनी एका प्रकारे पुण्याचे कामच सर्व नवोदित गायकांकरिता केलेले आहे. अगदी माफक दरात सर्वांना गायनाची संधी उपलब्ध करून देऊन सर्वांचे गाण्याचे स्वप्न,गाण्यासोबतच एक सुदृढ आरोग्य  व सर्वांना सुदृढ आरोग्य देऊन एक सुदृढ समाज निर्मितीचे काम या कराओके क्लबच्या माध्यमातून चंद्रकांत पोपट करीत आहेत. 

 शहराच्या मधोमध असणारा हा क्लब येण्या-जाण्याचे दृष्टीने सर्वांकरिता अत्यंत सोयीचा आहे. शिवाय क्लब मध्ये अधून मधून येणाऱ्या सेलिब्रिटी सुद्धा गायकांना प्रोत्साहित करून जातात. आतापर्यंत ज्युनिअर देव आनंद, जूनियर शशी कपूर, किशोर भानुशाली, भारत गणेशपुरे,वैशाली माडे, जुनियर जॉनी लिव्हर, धनश्री देशपांडे, इशिता विश्वकर्मा, संजय वत्सल, डॉ.राजेश उमाळे, तनवीर गाजी, ऋषिकेश रानडे, गीत बागडे, सौरभ अभ्यंकर, किरण शरद इत्यादी अनेक कलावंतांनी संगीत साधनाला भेट दिली आहे. 

याशिवाय सर्व सदस्यांचे वाढदिवस न चुकता आठवणीने क्लब मध्ये साजरे केले जातात. सर्व गायक- गायिका यांचे वाढदिवस त्यांच्याच गीताने त्यांना आदरांजली अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कराओके क्लब च्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रमांची विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्धी सुद्धा वेळोवेळी केली जाते. 

 श्री लोहाना महापरीषद, गुजराती समाज, भक्तीधाम, डॉक्टर गोविंद कासट मित्र मंडळी संगीत साधनाच्या माध्यमातून अंध,अपंग, कुष्ठबांधवांना अनेक रुग्णांना मदतीचा हात देऊन  हरिना च्या माध्यमातून देहदान,अवयवदान, नेत्रदान याकरिता रात्रंदिवस धडपड करून धन्वंतरी सारख्या रुग्णालयाला व अनेक ठिकाणी आतापर्यंत लाखो रुपयाची मदत रुग्णांना, विद्यार्थ्यांना करता-करता या सर्व व्यस्ततेतून स्वतःचा गायनाचा छंद जोपासून संगीत साधनांचीही परिपूर्ण साधना चंद्रकांत भाऊ करतात. आज या संगीत साधनांमध्ये अगदी १० वर्षापासून तर ७० ते८० वर्षापर्यंतचे सदस्य क्लबमध्ये असून ते नियमित सरावाकरीता येतात. पन्नाशीनंतर बीपी, शुगर, थायरॉईड, दमा यासारख्या अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना आपल्या या म्युझिक थेरपीद्वारे उत्कृष्ट जीवन व उत्कृष्ट जीवनाचा आनंद देण्याचे काम संगीत साधना द्वारे केल्या जात आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कराओके गायन स्पर्धा घेऊन अनेक गायकांना कराओके गायनाकरिता मोठा मंच उपलब्ध करून देऊन त्यांना पुरस्कृत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत साधनाने एकीकडे आपली कीर्ती प्रस्थापित केलेली आहे. विद्यार्थी ,गृहिणी, पोलीस, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, व्यावसायिक सर्व पेशातील सदस्य या ठिकाणी आपली गाण्याची हौस आवडीने पूर्ण करतात. आपल्या कमकुवत गायनाने सुरुवात करणाऱ्या अनेकांनी संगीत साधनांमध्ये सराव करून गायन क्षेत्रात आज त्यांच्या सरावाने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.अधून मधून गायनाच्या स्पर्धा,सहली, स्नेहभोजनाचे कार्यक्रमही संगीत साधनाच्या माध्यमातून सातत्याने केले जातात. व आपल्या सर्व व्यस्ततेतून, दुःखांमधून, संकटांतून मनसोक्त आनंदी जीवन जगण्याची कला देण्याचे कामही संगीत साधनांमधून कळत नकळत केल्या जात आहे.

म्हणूनच कराओके गायन क्षेत्रात, सामाजिक कार्यात, माणुसकी जपत आपली वेगळी ओळख तयार करणारृया  संगीत साधना कराओके क्लब ला त्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच नवोदित गायक, हौशी कलाकारांची गायन व संगीत कला अतिशय सुंदररित्या जोपासण्याचे कार्य संगीत साधनांच्या माध्यमातून सदोदित घडत राहो!

  देहदान,अवयवदान,नेत्रदान व पर्यावरणरक्षण याकरिता खूप चांगले कार्य संगीत साधना कराओके क्लब व पोपट परिवाराच्या माध्यमातून समाजाकरिता निरंतर घडत राहो! व संगीत साधनाला अनंत दीर्घायुष्य लाभो! हीच माता सरस्वतीच्या चरणी विनम्र प्रार्थना….

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!