महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटनेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध – आ. संजय खोडके
आमदार – संजय खोडके यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वितरण व यथोचित सन्मान
अमरावती : महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटनेचे सोबत आपला गेल्या अनेक वर्षांपासूनचा जिव्हाळा – स्नेह – आत्मीयता- ऋणानुबंध लक्षात घेता आपण संबंधित संघटनेचे पालकत्व आज स्वीकारताना आपण आज नमूद करू इच्छितो की, आगामी काळात संवैधानिक आयुधांचा वापर करीत महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटनेच्या समस्या सोडवीण्यासाठी वचनबद्ध आहोत. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून या संघटनेची कार्यप्रणाली ही इतर संघटनेच्या तुलनेत मजबूत – सक्षम तसेच वैचारिक दृष्टीने प्रगल्भ आणि परिपक्वतेने परिपूर्ण दिसून येत आहे. त्याचेच द्योतक म्हणून एकविसावे शतक व स्पर्धेचे युग लक्षात घेता, ऐक्य व संघटन कौशल्याच्या बळावर संघटनेची यशस्वी वाटचाल करण्यासह अविरतपणे वाटचाल सुरु आहे.असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी ते महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटनेच्या वतीने मोर्शी मार्ग परिसर स्थित संत गाडगेबाबा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे आयोजित नवनियुक्त राज्य पदाधिकारी व विभागीय पदाधिकारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा व साधारण सभा कार्यक्रमात ते बोलत होते.महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटनेचे राज्याध्यक्ष-महादेव
यावेळी आमदार संजय खोडके यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आय.टी. आय. निदेशक संघटनेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यासह त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अतिथी मान्यवरांची समयोचित भाषणे झालीत.यासोबतच याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल संजय विनायकराव खोडके यांचा नॅशनल फेडरेशन एडव्हायजरी बोर्ड, नवी दिल्ली, चेअरमन – भोजराज काळे तसेच महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. निदेशक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शाल -श्रीफळ -पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह तसेच विशालकाय हाराने माल्यार्पण करीत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई या सहाही विभागाचे नवनियुक्त पदाधिकारी यासोबतच महिला प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – सुरेंद्र भांडे यांनी तर प्रास्ताविक – मधुकर उघडे यांनी केले. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे रविन्द्र हिरे यांनी आभार मानले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य आय. टी. आय. संघटना चे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतलेत.