अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत एएसआयची आत्महत्या: पोलीस दलात शोककळा

अकोला : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अकोला पोलीस मुख्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, पोलीस दलात आणि शहरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी त्यांच्या मूळगावी म्हैसपूर येथे विष प्राशन करून हे टोकाचं पाऊल उचललं. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने अकोला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलीस दल हादरलं – कारण अद्यापही अस्पष्ट
या घटनेमुळे संपूर्ण अकोला पोलीस दल हादरलं असून, सहकारी अधिकारी, कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
एएसआय शिंदे यांनी आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही आत्महत्या वैयक्तिक कारणामुळे, कौटुंबिक तणावामुळे की ड्युटीवरील मानसिक दडपणामुळे झाली – याचा तपास सुरू आहे.