LIVE STREAM

Accident NewsLatest NewsPune

झिपलायनिंग करताना युवती सिमेंटच्या ब्लॉकवर आदळली, कुटुंबादेखत जीव सोडला

पुणे : मोठा विकेंड बघून कुटुंबासोबत सहलीला गेलेल्या 28 वर्षीय तरुणीचा झिपलायनिंग हा साहसी खेळ खेळताना 30 फुटावरून कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे . तरल आटपाळकर (28) असे या तरुणीचे नाव असून पुण्यातील बाणेरच्या एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ही तरुणी काम करायची. सुट्टी असल्याने कुटुंबीयांसोबत पुणे- सातारा महामार्गावर असलेल्या राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये ती गेली होती . तिथेच ही दूर्घटना घडली.

तिथे झिपलाइनिंग हा साहसी खेळ असल्याचे कळाल्यानंतर रिप्लायिंग करण्यासाठी 30 फूट उंचीच्या टॉवरवर ती गेली . राईड सुरू करण्याच्या तयारीत असताना सुरक्षेसाठी बांधण्याचा दोर लावण्यासाठी स्टूल वर चढली .मात्र स्टूल हलल्याने तिचा पाय सटकला आणि 28 वर्षीय तरल 30 फुटावरून खाली कोसळली. यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

कुटुंबासोबत सहलीला गेली, झिपलायनिंग करताना मृत्यू
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने कुटुंबीयांसोबत शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता 12 जणांसोबत तरल राजगड वॉटर पार्कला गेले होते . वॉटर पार्कचे प्रतिव्यक्ती 1200 रुपयांचे प्रवेश शुल्क देऊन विविध खेळ खेळले, जेवले आणि मजा केली .झिपलायनिंग हा दिवसातील शेवटचा उपक्रम असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं . रिप्लायिंग करण्याची तरलची पाळी आली तेव्हा ती खूप उत्साहात होती . काय झाले ते कोणालाच कळले नाही. पण साधारण 25 ते 30 फूट सिमेंटच्या ब्लॉक वर ती वरून खाली पडली आणि कुटुंबीयांचा ठोका चुकला .तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणत्याही चुकीमुळे पडण्यापासून रोखण्याचे वॉटर पार्क एरियात कोणतेही उपाय नव्हते असे तरलच्या कुटुंबीयांचा आरोप आहे .

कुटुंबासाठी एकमेव कमावती मुलगी
तरल ही कुटुंबीयांसाठी एकमेव कमावणारी मुलगी होती .तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले .तरुणीची आई गृहिणी आहे .छोट्या शिलाई कामातून तुटपुंजी कमाई ती करते .यावर्षी डिसेंबर मध्ये तरलच्या लग्नाचे नियोजनही करण्यात येत होते असे कुटुंबीयांनी सांगितले .दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीसही घटनास्थळी हजर झाले . वॉटर पार्कच्या चालक आणि मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तरलला तातडीने नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले . तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याचा अहवाल येणे अजून बाकी आहे .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!