शेतकरी विधवा गीता चिंचोलकर हिच्या लक्ष्मीच्या लग्नात समाजाकडून मदतीच्या वर्षाव
१९९६ पासून विदर्भात दररोज ८ शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहेत, एकीकडे राजकीय पक्ष कृषी संकटाचे राजकारण करून सत्तेत येत आहेत मात्र कृषी संकटावर तोडगा निघत नसून आजही कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आत्महत्या अशाच चालू आहेत मात्र या कृषी संकटाचे जे हजारो शेतकरी बळी पडले आहेत त्यांच्या विधवा व कुटुंबातील सदस्यांच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत मात्र ही कुटुंबे आज उपासमारी व देशोधडीला लागले आहेत.
अशीच या कृषी संकटामुळे कोपामांडवी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ येथील श्रावण चिंचोलकर यांनी ऑक्टोबर २००६ मध्ये आत्महत्या केली होती, त्यावेळी श्रावण चिंचोलकर याची १७ वर्षाची विधवा गीता चिंचोलकर आपल्या ६ महिन्याची कोवळी लेकरू लक्ष्मी सोबत विधवा व अनाथ झाली व काल २० एप्रिल रोजी हिच्या मुलीच्या म्हणजे आमच्या लक्ष्मी च्या लग्नाला कोपमांडवी परिसरातील सर्वच खेड्यातून प्रत्येक कुटुंबातील मंडळी उपस्थीत होती व समाजातील प्रत्येक स्तरातून लक्ष्मीला प्रेमाचा व मदतीचा वर्षाव झाला व लक्ष्मी चे लग्न एक अविस्मरणीय ऐतिहासिक कार्यक्रम म्हणून सध्या या शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात चर्चेचा विषय ठरत आहे, मात्र संवेदन शून्य प्रशासन मात्र नियोजन व निधी उपलब्ध नसल्याने मदत देता येत नाही म्हणून बघ्याची भूमिकेत होते.
मराठवाकडी येथील तरुण शेतकरी कुणाल वाघाडे यांनी एकही पैसा व वस्तू न घेता लक्ष्मी सोबत लग्नाचा प्रस्ताव दिला व लक्ष्मी पुढे शिकविण्याची तयारी दाखवली व हे लग्न अशा प्रकारे आदर्श रित्या ठरले व संपूर्ण सहयोग व सहभागाने संपन्न झाले.
शेतकरी विधवा गीता चिंचोलकर यांनी संघर्ष करून आपला संसार रोज मजूरी करून रेटला… आम्ही प्रत्येक अडचणीत सतत गीता सोबत होते… लग्नाच्या वेळी कोपा मांडवी येथील सर्व गावकरी सहभागी झाले होते व महिलांनी आपल्या मुली सारखा प्रेम दाखवित असल्याचे चित्र दिसले…. नागपूर येथील खुशरू पोचा सह व विधान परिषदेच्या सभापती निलमताई गोऱ्हे ,आमदार मदन येरावार अजय संचेती ग्रँड मराठा फाउंडेशन ,खेतानी फाउंडेशन, जगदंबा मंदिर संस्थान, लायका गुझदार, चंद्रा नायक, सतीश झाझरिया, सुविधी सुराणा, रोहित पाटील, आमदार संजय देरकर, आमदार हेमंत पाटील , नितीन सरदार यांच्या सारख्या दानशूर व्यक्तींनी तसेच
समाजातील विविध स्तरावरून गीता चिंचोलकर हिला मदतीचा हात पुढे आला असल्यामुळे हा एक अविस्मरणीय लग्न सोहळा झाला आहे… यावेळी स्मिता तिवारी, अंकित नैताम व शेतकरी विधवा साठी नेहमी मदतीचा हात देणारे किशोर तिवारी उपस्थित होते.. लक्ष्मी च्या लग्नाला परिसरातील सर्वच खेड्यातून मदत करण्यासाठी शेतकरी व शेतमजूर समोर आल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
यावर्षी नापिकीमुळे व मुलीचे शिक्षण व सावकारी तसेच बचत गटाचे मायक्रो फायनान्स कर्ज यामुळे गीता चिंचोलकर अडचणीत आहे तिला समाजातील सुजाण दानशूरानी तिच्या खात्यात जमा केले.